मेहंदी लावण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडितेची प्रकृती चिंताजनक

मुंबई तक

• 08:00 AM • 07 Oct 2026

Crime News : मेहंदी लावण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची ही दुर्दैवी घटना समोर आली आहे. या क्रूर घटनेनंतर मुलीची प्रकृती खालावली.

crime news  (AI Photo)

crime news (AI Photo)

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

मेहंदी लावण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

point

पीडितेची प्रकृती चिंताजनक

Crime News : मेहंदी लावण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची ही दुर्दैवी घटना समोर आली आहे. या क्रूर घटनेनंतर मुलीची प्रकृती खालावली आणि तिला गंभीर अवस्थेत राजस्थानातील कोटा येथील न्यू मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले, नंतर त्या ठिकाणी पीडितेवर उपचार करण्यात आले आहेत. सध्या पीडितेची प्रकृती ही चिंताजनक असल्याची माहिती समोर आली. पीडितेच वय 16 वर्षे असून कुटुंबीयांनी आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी केलीय. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : सांगलीत अनैतिक संबंधातून 52 वर्षीय व्यक्तीची हत्या, हृदयविकाराचा बनाव रचत काढला काटा

मेहंदी लावण्यासाठी गेलेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार

संबंधित प्रकरणात कुटुंबीयांनी केलेल्या आरोपावरून पीडित मुलगी ही मेंहदी लावण्यासाठी एका ओळखीच्या व्यक्तीकडे गेली होती. यादरम्यान दोन तरुणांनी पीडितेवर लैंगिक अत्याचार केला आणि अशा परिस्थितीत पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच बापवार पोलीस ठाण्यात घटनेचा पुढील तपास करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून घटनेच्या सभोवतालच्या तपशिलांचा तपास करत आहेत. कुटुंबीयांनी आरोपींना कडक शिक्षा करावी अशी मागणी करत आहेत. 

या प्रकरणी पीडितेच्या वडिलांनी सांगितलं की, मुलगी ही 16 वर्षांची असून तिच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी एका व्यक्तीकडे गेली होती. महिला तिला दुसऱ्याच ठिकाणी घेऊन गेली होती. तिथे घटनास्थळी दोन तरुणांनी पीडितेवर अत्याचार केला होता, यानंतर पीडितेला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पीडितेला दोनदा रक्त चढवण्यात आल्याची माहिती आहे. 

हे ही वाचा : इयत्ता दहावीच्या विद्यार्थीनीचे अपहरण, गुंगीचे इंजेक्शन देत केला लैंगिक अत्याचार

या घटनेची पोलिसांना मिळताच, त्यांनी घटनेचा पुढील तपास सुरू केला. आरोपींपर्यंत पोहण्यासाठी पोलीस या घटनेच सहभागी असल्यांची कसून चौकशी करत आहेत. पोलिसांनी घटनेची परिस्थिती आणि सहभागी असलेल्या व्यक्तींविषयीची माहिती गोळा करत आहेत.