Nagpur Crime News : नागपुरात 17 वर्षीय मुलीने स्वतःच्या 45 वर्षीय वडिलांच्या डोक्यात लाकडी बॅटने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने वडिलांचा मृत्यू झाला. नागपुरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मृत व्यक्तीचे नाव जयपाल बारेलाल खोलपिटणे असे आहे. या घटनेमुळे पिता-मुलीच्या नात्याला धक्का देणारी घटना समोर आली आहे. पोलिसांनी 17 वर्षीय मुलीला आपल्या देखरेखीखाली घेतले असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : राहुल गांधी बॅरिकेडवर चढले, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात; निवडणूक आयोगाच्या कार्यालयाजवळ राडा
वडिलांच्या दारू पिण्यामुळे कुटुंबात अनेकदा वाद
पोलिसांच्या माहितीनुसार, जयपाल यांना दारूचे व्यसन होते. त्यांच्या दारू पिण्यामुळे कुटुंबात अनेकदा वाद होत असल्याचे समोर आले आहे. जयपाल यांची पत्नी लोकांच्या घरात घरकाम करते, तर त्यांची 17 वर्षीय मुलगी बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. या कुटुंबात एक लहान मुलगाही आहे. घटनेच्या रात्री जयपाल हे दारूच्या नशेत घरी आल्याचा आरोप कुटुंबीयांच्या तक्रारीत करण्यात आला आहे.
हेही वाचा : नवी मुंबई विमानतळावर प्रवाशांसाठी वाहतुकीची मोठी सोय! बस, टॅक्सी, रिक्षासह अनेक पर्याय
लाकडी बॅट उचलून वडिलांच्या डोक्यावर केला हल्ला
कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार, जयपाल यांनी दारूच्या नशेत मुलीला शिवीगाळ केली. तसेच तिच्याशी जबरदस्तीने जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मुलीने त्याला विरोध केला. त्यानंतर दोघांमध्ये वाद वाढला. यावेळी जयपाल यांनी मुलीला मारहाण केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या वादादरम्यान 17 वर्षीय मुलीने घरात ठेवलेली लाकडी बॅट उचलून वडिलांच्या डोक्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात आले आहे.
या हल्ल्यात जयपाल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. 17 वर्षीय मुलीला पोलिसांनी आपल्या देखरेखीत घेतले असून घटनेमागील नेमका घटनाक्रम तपासला जात आहे. या प्रकरणी नागपूर शहर पोलीस उपायुक्त ऋषिकेश सिंगा रेड्डी यांनी माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT












