Crime News : देशात सध्या अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. वडिलांच्याच वयाच्या एका पुरूषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना आहे. नंतर पीडितेच्या आई-वडिलांची हत्या करेन अशी देखील धमकी दिली. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. संबंधित प्रकरणातील आरोपीचं वय (50) आहे. तर पीडित मुलीचं वय अवघं 9 वर्षे असल्याची माहिती आहे. ही घटना बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातील असून घटनेनं पूरता परिसर हादरून गेलाय.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : चंद्रपुरात पुरूषानं घेतला तंत्र मंत्राचा आधार, महिलेला शेजारच्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडलं
मिर्ची तोडण्याच्या बहाण्याने मुलीवर अत्याचार
पीडितेच्या आईने महिला पोलीस ठाण्यात संबंधित प्रकरणाची तक्रार दाखल केली. आरोपीची ब्रह्म मेहता (वय 50) अशी ओळख समोर आली. त्याने मुलीला मिर्ची तोडण्याच्या बहाण्याने दोन किमी अंतरावरील शेतात नेले. तिचे हात-पाय बांधून पीडितेवर अत्याचार करण्यात आला होता. नंतर आरोपीने पीडितेला कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. भयभीत झालेली पीडित मुलगी आपला जीव वाचवून आई-वडिलांकडे गेली होती.
आई वडिलांना मारहाणीची धमकी
पीडितेच्या वडिलांनी सांगितलं की, जेव्हा त्यांनी पोलीस ठाण्यात घटनेची तक्रार केली असता, पीडितेच्या आई वडिलांना मारहाणीची धमकी देण्यात आली होती. आरोपींनी पीडित कुटुंबावर तक्रार करू नये यासाठी अनेकदा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. पीडित कुटुंबाने न घाबरता 31 जुलै रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. महिला पोलीस नीतू कुमारी यांनी सांगितलं की, पीडितेच्या आईनं केलेल्या दाव्यानुसार तक्रार दाखल करण्यात आली. संबंधित प्रकरणात आरोपी ब्रह्म मेहताला अटक करण्यात आली.
हे ही वाचा : Astrology : बुधाचा कर्क राशीत प्रवेश, ऑगस्ट महिन्यात 'या' राशींचं नशीब चमकणार
अटकेनंतर आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. ज्यात आरोपीने पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं.
ADVERTISEMENT












