दारूच्या नशेत बोगस डॉक्टर, You Tube वर व्हिडिओ बघून केलं ऑपरेशन, नंतर रुग्णाचा दुर्दैवी अंत

crime news : क्लिनिक चालवणाऱ्या काका-पुतण्याच्या जोडीने एका महिलेवर प्राणघातक प्रयोग केला आहे. किडनी स्टोनने ग्रासलेल्या महिलेचं ऑपरेशन करण्यासाठी एका बोगस डॉक्टरांनी मोबाईलमध्ये 'You Tube' वर व्हिडिओ पाहिला आणि त्याच चुकीच्या पद्धतीने ऑपरेशन केलं.

crime news

crime news

मुंबई तक

• 02:37 PM • 11 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

काका-पुतण्याचा महिलेवर प्राणघातक प्रयोग

point

बनावट डॉक्टरने 25 हजार उकळले 

crime news : क्लिनिक चालवणाऱ्या काका-पुतण्याच्या जोडीने एका महिलेवर प्राणघातक प्रयोग केला आहे. किडनी स्टोनने ग्रासलेल्या महिलेचं ऑपरेशन करण्यासाठी एका बोगस डॉक्टरांनी मोबाईलमध्ये 'You Tube' वर व्हिडिओ पाहिला आणि त्याच चुकीच्या पद्धतीने ऑपरेशन केलं. ऑपरेशन करताना डॉक्टरांनी चुकीची नस कापल्यानं महिलेचा दुर्दैवा अंत झाला. या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई म्हणून क्लिनिकच सील केलं आहे, या प्रकरणाचा आरोपीने शोध सुरु केला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधूकडून घटस्फोटाची मागणी, हनीमूनच्या रात्री नवऱ्याचं... दोन्ही कुटुंब हादरले

बनावट डॉक्टरने 25 हजार उकळले 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यांतील कोठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दफरापूर माजरा सैदानपूर गावात घडली आहे. किडनी स्टोनच्या त्रासाने तेह बहादूर रावत यांच्या पत्नी मुनीश्र रावत अगदी त्रस्त होत्या. तेव्हा कुटुंबियांनी त्यांना रुग्णालयात नेले. त्याच ठिकाणी असलेल्या क्लिनिक चालक ज्ञान प्रकाश मिश्राने तपासाणीनंतर सांगितलं की, किडनी स्टोन आहे आणि तातडीने त्यांचं ऑपरेशन करावं लागणार आहे. एवढंच नाहीतर ऑपरेशनसाठी बनावट डॉक्टरने तब्बल 25 हाजारांची मागणी केली होती.

दारूच्या नशेत You Tube ओपन करून बनावट डॉक्टरकडून स्टोनचं ऑपरेशन

याच प्रकरणात आता महिलेसोबत घडलेल्या धक्कादायक प्रकरणावरून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. जेव्हा महिलेला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं असता, डॉक्टर ज्ञान प्रकाश मिश्रा हा दारूच्या नशेत होता, त्याने कसलंही ज्ञान घेतलं नव्हतं. त्याने मोबाईलवरील You Tube ओपन करून स्टोनचं ऑपरेशन कसं करावं याचा व्हिडिओ पाहिला आणि महिलेचं ऑपरेशन करण्यास सुरुवात केली. या अर्धवट ज्ञानामुळे आणि दारूच्या नशेत असलेल्या डॉक्टरांनी महिला रुग्णाच्या नसाच कापून टाकल्या. खूप रक्तस्त्राव आणि चुकीच्या उपचारामुळे दुसऱ्याच दिवशी महिलेचा दुर्दैवी अंत झाला.

हे ही वाचा : Astrology : 'या' राशीतील लोकांवर पडणार पैशांचा पाऊस, जाणून घ्या तुमच्या राशीचे आजचे भविष्य

या प्रकरणातून समोर आलं की, मुख्य आरोपी ज्ञान प्रकाश मिश्राचा पुतण्या विवेक कुमार मिश्रा हा रायबरेलीतील एका आयुर्वेदिक रुग्णालयात सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. त्याच्या नावाचाच वापर करून काका-पुतण्यांनी नको तेच कांड केलं आहे. आता रुग्णालयात सील केले असून आरोपी फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.

    follow whatsapp