बायकोच्या ज्यूसमध्ये उंदीर मारण्याचे औषध, विधवा महिलेशी संबंध..

मुंबई तक

17 Jun 2026 (अपडेटेड: 17 Jun 2026, 05:00 PM)

Crime News : एका विधवेशी संबंध ठेवण्यासाठी तरुणाने बायकोची हत्या केली. संबंधित प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे, या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. गोकाक तालुक्यातील शिंदिकुरबेट गावातील रहिवासी सक्कबाई पटायत असं खून करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

नवऱ्याने बायकोच्या थंडप्येयात उंदीर मारण्याचे औषध मिसळले अन्.. 

point

रस्त्याच्या कडेला मृतदेह

Crime News : कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यात, गावातील एका विधवेशी संबंध ठेवण्यासाठी तरुणाने बायकोची हत्या केली. संबंधित प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे, या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. गोकाक तालुक्यातील शिंदिकुरबेट गावातील रहिवासी सक्कबाई पटायत असं खून करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. तसेच खून केलेल्या आरोपी नवऱ्याची संतोष पटायत अशी ओळख उघडकीस आली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 17 वर्षांची मुलगी तलावातून अंघोळ करून बाहेर आली, 3 नराधमांनी घेरत निर्जनस्थळी..

नवऱ्याने बायकोच्या थंडप्येयात उंदीर मारण्याचे औषध मिसळले अन्.. 

संतोष आपल्या बायकोला एका मंदिरात घेऊन गेला, मंदिरातून परतताना संतोषने एका शीतप्येयात उंदीर मारण्याचे औषध मिसळले. नंतर तेच औषध सक्कुबाईला दिल्याचा आरोप आहे. नंतर सक्कुबाईल बेशुद्ध पडली असता, तिला रस्त्याच्या एका कडेला गळा दाबून फेकून देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.  

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने पत्नीच्या मृतदेहावरून आपली मोटारसायकल टाकून हत्येचा प्रकार असल्याचा बनाव रचला. घडलेल्या घटनेनुसार, तो स्वत: पोलीस नियंत्रण कक्षेला फोन करण्यापूर्वी बराच वेळ रस्त्याच्या कडेला थांबून होता. सक्कुबाईच्या मृत्यूबाबत संशय आल्याने, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी बेळगावी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायसेन्स येथे पाठवला. शवविच्छेदनाच्या अहवालातून ही हत्या असल्याचं उघडकीस आले. 

हे ही वाचा : लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण, 'तसले' व्हिडिओ रेकॉर्ड केले..

पोलीस तपासातून माहिती समोर आली की, धारवाड तालुक्यातील कल्लर गावातील रहिवासी संतोष आणि सक्कुबाई यांचा विवाह नऊ वर्षांपूर्वी झाला होता. गेल्या काही वर्षांपासून गावातील एका विधवेशी प्रेमसंबंध होते. संतोषला अटक करून हिंदळगा तुरुंगात पाठवण्यात आले. या हत्येत विधवा महिलेचा काही संबंध आहे का? याचा पोलीस तपास करत आहेत.