तरुणाने महिला पोलीस कॉन्स्टेबलला पाठवले अश्लील फोटो, आरोपीवर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

crime news : महिला कॉन्स्टेबलला एका अनोळखी तरुणाने फोन करून तिच्याशी गैरवर्तन केले, याच प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime news

crime news

मुंबई तक

• 05:57 PM • 10 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

महिला कॉन्स्टेबलला अनोळखी नंबरवरून फोन

point

आरोपीच्या संवादाचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड 

Crime News : एका महिला कॉन्स्टेबलला एका अनोळखी नंबरवरून फोन आल्याची घटना घडली आहे. दीपाली सिंगने कॉल घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने एका पुरुषाचा आवाज आला. त्याने आपण राजेश अशी ओळख सांगितली होती. एवढंच नाहीतर त्याने दीपालीशी गैरवर्तन केलं. इतकेच नाही तर आरोपीने व्हॉट्सअॅपवर महिला कॉन्स्टेबलला अश्लील फोटोही पाठवले होते. आरोपीने वाईट वर्तन करणे कधीच थांबवले नाही, तेव्हा दीपाली सिंग नाराज झाली आणि त्याने यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिला कॉन्स्टेबल दीपाली सिंगच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना आग्राच्या खंडौली पोलीस ठाणे परिसरातील आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : एक्सप्रेसवेवरील टोल नाक्यावर कारमध्ये रोमान्स, मॅनेजरची नजर नको तिथेच... प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांकडे

नेमकं काय घडलं? 

दीपाली सिंग म्हणाली की, तिला 6 डिसेंबर रोजी पहिला फोन आला होता. तेव्हा ती ड्युटीवर होती, तिने सांगितलं की, तिला एकदाच नाहीतर अनेकदा फोन करण्यात आला होता. फोन करणाऱ्याने स्वत: राजेश अशी ओळख सांगितली. आरोपीने तिला अश्लील फोटो पाठवले होते. 

आरोपीच्या संवादाचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड 

दीपाली सिंग यांच्या म्हणण्यानुसार, तिच्याकडे आरोपीशी संवाद केलेले संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आले होते. तिने पोलिसांना व्हिडिओ रेकॉर्डिंगचे स्क्रीनशॉट आणि अश्लील फोटो देखील दिले आहेत. या प्रकरणात तक्रारीच्या आधारे पोलीस, ठाण्याच्या अधिकाऱ्याने अहवाल नोंदवत तपास सुरु केला. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक काम करत आहेत आणि कॉल डिटेल्सच्या आधारे तपास सुरु करण्यात आला आहे.

हे ही वाचा : धाराशिवमध्ये बाईच्या नादाला लागला तरुण... सोनं, नाणं, पोस्टातील पैशांसह सारंच घबाड लुबाडलं, अखेर तरुणाने...

या संदर्भात एसीपी एतमादपूर यांनी सांगितलं की, या घटनेच्या संदर्भात एफआरआय दाखल करण्यात आला आहे. तसेच तपास सुरु असून गरज पडल्यास सायबर सेलचा सल्ला देखील घेतला जाणार आहे. 

    follow whatsapp