तरुणीचं लग्न ठरलं होतं, तरुणाने तिला जबरदस्ती विष पाजलं अन् स्वत:च नेलं रुग्णालयात, नंतर भलतंच कांड...

मुंबई तक

• 01:56 PM • 21 Mar 2026

Crime News : तरुणाने आपल्या मैत्रिणीला जबरदस्ती विष पाजलं. तरुणीचा दुसऱ्या तरुणाशी साखरपुडा झाला होता, याच रागातून त्याने तिला विष पाजल्याचं कारण उघडकीस आलं. त्याने अनेकदा लग्न मोडण्याचा प्रयत्न देखील केला होता. पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, त्या तरुणाने अनेकदा नकार दिला होता, नंतर आरोपीने तरुणीला विष पाजून स्वत:देखील विष प्राशन केले.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

साखरपुडा मोडण्यासाठी पीडितेला जबरदस्ती विष पाजलं

point

महिलेची प्रकृती बिघडली

Crime News : फरिदाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलं, एका तरुणाने आपल्या मैत्रिणीला जबरदस्ती विष पाजलं. तरुणीचा दुसऱ्या तरुणाशी साखरपुडा झाला होता, याच रागातून त्याने तिला विष पाजल्याचं कारण उघडकीस आलं. त्याने अनेकदा लग्न मोडण्याचा प्रयत्न देखील केला होता. पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, त्या तरुणाने अनेकदा नकार दिला होता, नंतर आरोपीने तरुणीला विष पाजून स्वत:देखील विष प्राशन केले. आरोपीचे नाव मोनू भाटी असे आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'मी त्यांचा राजीनामा..' रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याबाबत सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

साखरपुडा मोडण्यासाठी पीडितेला जबरदस्ती विष पाजलं

पोलिसांनी सांगितलं की, आरोपी आणि पीडित महिला आठ वर्षांपासून मित्र होते. जानेवारी महिन्यात दुसऱ्या पुरुषाशी साखरपुडा झाल्यानंतर, तिने आरोपीशी संपर्क तोडला. संतापलेल्या आरोपीने साखरपुडा मोडण्यासाठी तिच्यावर दबाव आणला होता. तिने स्पष्टपणे नकार दिला, तेव्हा त्याने तिला विष पिण्यास जबरदस्ती केली, असा आरोप आहे. 

हिलेची प्रकृती बिघडली

संबंधित प्रकरणात घटनेनंतर जेव्हा महिलेची प्रकृती बिघडली, तेव्हा आरोपीने तिला रुग्णालयात नेले. तसेच डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती आहे. सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. 

हे ही वाचा : सुरुवातीला दहशतवादी हल्ल्याची शंका, मात्र पोलिस तपासात वेगळीच माहिती समोर; 'त्या' ब्लास्ट प्रकरणात नेमकं काय घडलं?

पीडितेनं केलेल्या तक्रारीच्या आधारे, सेक्टर-58 पोलीस ठाणे परिसरात शुक्रवारी गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध एफआरआय दाखल केला.