Extra Marital Affairs : एका तरुणाने आपल्याच पत्नीची हत्या केली. त्या हत्येनंतर आरोपी तरुणाने पत्नीचा मृतदेह जमिनीत गाडून ठेवला. आरोपी पतीने केलेल्या कृत्यामुळे पोलिसांनी त्याला रेल्वे स्थानकावर अटक केल्याचे वृत्त आहे. आरोपीचे नाव सोनी एसके (वय 21) असे आहे. तसेच पत्नीचे नाव अल्पना खाथून (28) असे आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : सरकारी रुग्णालयातील शौचालयात 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
पतीने पत्नीची 'त्या' कारणावरून केली हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोनी एसकेवर मुर्शिदाबाद येथील रहिवासी असलेल्या अल्पना खाथूनची हत्या केली. तसेच अयारकुन्नम येथील बांधकाम सुरु असलेल्या घराजवळ तिला पुरण्यात आल्याचा आरोप आहे, त्याच ठिकाणी संबंधित पती-पत्नी काम करत होते.
पत्नी तीन दिवसांपूर्वी बेपत्ता
पती एसके यांनी 17 ऑक्टोबर रोजी बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली होती, यात दावा करण्यात आला की, त्यांची पत्नी तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. सोनी यांनी त्यांच्या जबाबात म्हटलं की, 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता खाथून यांच्यासोबत किराणा मालाचे सामान खरेदी करण्यासाठी बाजारात गेला होता, परंतु सायंकाळी 6:30 वाजता कामावरून घरी परतत असताना, तो घरी नव्हताच. तीन दिवसानंतर घटनेची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांना भलताच संशय बळावला.
पत्नीवर लोखंडी रॉडने हल्ला आणि गळा दाबत संपवलं
पोलिसांनी आरोपी सोनी एसके हिला शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं, पण कोणीही त्याला सहकार्य केले नाही. तो त्याच्या दोन मुलांसह पश्चिम बंगालला जाण्यासाठी एर्नाकुलमला ट्रेनमध्ये चढले आणि निघाले. त्याचवेळी पोलिसांनी गूप्तयंत्रणेच्या माहितीवरून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तसेच त्याला अयार्कुन्नम येथे परत आणले. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोनी एसके बांधकामाच्या ठिकाणी खाथूनची हत्या केल्याचा कबुलीनामा दिला. या हल्ल्यात त्याने पत्नीवर लोखंडी रॉडने हल्ला केला आणि नंतर तिचा गळा दाबल्याचे सांगितले, मृतदेह कामाच्या ठिकाणी एका जागेत पुरला.
हे ही वाचा : इंदापूरातील मदनवाडी गावात गर्भवती महिलेचा चादरीत आढळला मृतदेह, हातावर होता 'त्या' नावाचा टॅटू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनीने खाथूनची हत्या करण्याचे कारण समोर आले. तिचा विवाहबाह्यसंबंध असल्याचा त्याला संशय होता. पोलिसांनी पुढे सांगितलं की, आरोपीला पोलीस ठाण्यात नेत अटक केली. तपासाचा भाग म्हणून नंतर त्याला न्यायालयात हजर केलं जाणार असल्याचे पोलिसानी सांगितलं, या वृत्ताची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिली असल्याचे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT











