Crime News : दिल्लीमध्ये केवळ 400 रुपयांवरून दोन मजुरांमध्ये वाद झाला, त्यापैकी एका मजुराने दुसऱ्या मजुरावर चाकूने सपासप वार करत हत्या केली. ही घटना 2016 मध्ये झाल्याचं वृत्त होतं, तब्बल नऊ वर्षानंतर पोलिसांनी या हत्याकांडातील आरोपी मोविन खान (वय 40) याला आग्रा जिल्ह्यातील रिचोहा गावातून मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मुंबई महापालिकेत AIMIM पक्षाचे गटनेते झालेले विजय उबाळे कोण आहेत?
400 रुपये आणि मोबाईल फोनवरून दोघांमध्ये मोठा वाद
हे प्रकरण दिल्लीतील कांझावाला भागातील असून, 2016 च्या अखेरीस नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला झालेल्या एका किरकोळ वादातून एकाचा मृत्यू झाला होता. मोविन आणि मृत तरुण मलखान हे दोघेही कांजावला येथील कामगार चौकात मजुर म्हणून काम करत होते. डिसेंबर 2016 मध्ये दोघांमध्ये 400 रुपये आणि मोबाईल फोनवरून मोठा वाद झाला होता,
मोविनने मलखानची गळा चिरून हत्या केली, नंतर मृतदेह शेतात फेकून दिला
त्याचवेळी मोविन खान रात्रीच्या वेळी चाकून घेऊन आला, त्याचे काही मित्र हे न्यू इयर पार्टीत गुंतले होते. तेव्हा मलखान हा दारूच्या नशेत होता. त्याचक्षणी रागाच्या भरात मोविनने मलखानची गळा चिरून हत्या केली, नंतर तो मृतदेह शेतात फेकून दिला. काही तासानंतर मलखान गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला आणि नंतर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.
या हत्येनंतर मोविन खान हा दिल्लीहून पळून गेला, नंतर तो वारंवार बिहार, झारखंड, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यात लपून बसला होता. न्यायालयाने तो फरार घोषित केले होते आणि नंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. नंतर त्याचा आपल्या कुटुंबाशी फारसा संपर्क राहिला नव्हता.
हे ही वाचा : दुकानाबाहेर महिलेच्या लेहंग्यातून पडला तूपाचा डबा, झडती घेताच 30 हजारांचं सामान... चित्रपटाला लाजवेल अशी घटना
दरम्यान, काही महिन्यांपासून गुन्हे शाखेनं चार राज्यांमध्ये त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. गेल्या आठवड्यात पोलिसांना छापे टाकत आरोपीबाबत माहिती मिळाली. मोविन हा आग्रा येथून पत्नीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असताना, कारवाई करत त्याला अटक केली.
ADVERTISEMENT











