Crime News : एका साडे तीन वर्षाच्या चिमुरड्याला खुर्चीला बांधून बेदम मारहाण करण्यात आली. नंतर त्याच चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. या लज्सास्पद घटनेनं उत्तर पूर्व दिल्ली हादरून गेली आहे. चिमुकल्यासोबत केलेली हैवानी सीसीटीव्हीमध्ये कैद केल्याची माहिती टीव्ही 9 या वृत्तमाध्यमाने दिली आहे. यानंतर नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीवरून शाळेचे संचालक, प्राचार्य, शिक्षक आणि आया यांच्या विरोधात पॉक्सो कायदा, बाल न्याय कायदा आणि बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : चंद्रपूर हादरलं! नवऱ्यासह मित्राचा महिलेवर अत्याचार, स्मशानभूमीतील भयंकर घटना
विद्यार्थ्याच्या कानांच्या पडद्यांना तीव्र सूज
पीडित मुलाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं की, चिमुरडा हा काही दिवसांपासून खूप भयभीत झाला होता. तो शौचालयाला देखील जाण्यास घाबरत होता. अचानकपणे तो मध्यरात्री उठायचा. त्याच्या कानांच्या पडद्यांना तीव्र सूज असल्याचे दिसून आले होते. मारहणीत मुलाच्या कानावर गंभीर दुखापत झाली असल्याची डॉक्टरांनी संशय व्यक्त केला होता.
जेव्हा कुटुंबाने शाळेच्या संचालकांकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली असता, त्याने सुरूवातीला कॅमेरे खराब असल्याचे कारण सांगितले. नंतर दबाव टाकल्यावर कुटुंबाकडून 1500 शुल्क आकारले होते. जेव्हा वडिलांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, शिक्षक विद्यार्थ्याचे कान पकडून त्याला निर्दयपणे मारहाण करत असल्याचे दिसून येते.
मुलावर लैंगिक अत्याचाराचा आरोप
मुलाला तासनतास खुर्चीला बांधून ठेवले असता, त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. एक दुसऱ्या फुटेजमध्ये शाळेतील एका मुलावर लैंगिक अत्याचार करताना दिसत आहे. या घटनेनं मुलाला आता शौचालयात जाण्यास देखील भीती वाटू लागली आहे.
मुख्यध्यापकाचा बेजबाबदारपणा
कुटुंबीयांनी मारहाणीबाबत मुख्यध्यापकाकडे तक्रार केली असता, मुख्यध्यापकाने बेजबाबदारपणा दाखवला. मुख्यध्यापकाने सांगितलं की, मुलांना अशीच मारहाण होते, तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करावं. यानंतर पीडित मुलाच्या नातेवाईकांनी जाफराबाद येथे तक्रार दाखल केली. तेव्हा पोलिसांनी मारहाणीमुळे रक्तस्त्राव होत असल्याची माहिती दिली.
हे ही वाचा : मानस भित्रा होता की सायको किलर? मेहुणीच्या एन्ट्रीने सगळं उघडं पडलं
जाफराबाद पोलीस ठाण्याने घटनेचे फुटेज असलेला डीव्हीआर जप्त केला आहे. पोलिसांनी शाळा प्रशासन, संचालक, प्राचार्य, आरोपी शिक्षक आणि आया यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून तपास तीव्र केला आहे.
ADVERTISEMENT












