Crime News : उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात कौटुंबिक वादातून मुलानेच आपल्या आईच्या डोक्यात विटेने हल्ला करत संपवलं. संबंधित तरुण हा दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आली. त्याच तरूणाने केलेल्या कृत्याने परिसर हादरून गेला आहे. या घटनेनं घटनास्थळावर एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : सोलापूर: पुतण्याने काकाला परस्त्री सोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, काकानं मुलासोबत...
दारूच्या नशेत तरुणानं आईला संपवलं
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीची ओळख राधाचरण (वय 35) असल्याचे सांगण्यात येते. तो रविवारी रात्री 9 वाजता आपल्या घरी दारूच्या नशेतच होता. नंतर घरात लहान बहीण गुडियावरून काही कारणावरून कौटुंबिक वाद निर्माण झाला. बघता बघता वाद वाढला आणि घरातील वातावरण तणावपूर्ण झालं.
दारूच्या नशेच लेकानं विटेनं केला हल्ला
जेव्हा वाद वाढत गेला तेव्हा आई रामरती (वय 75) ही भांडण सोडवण्यासाठी पुढे सरसावली होती. तिने दोघांनाही शांत राहण्यास समजूत देखील काढली. नशेत असलेल्या लेकाने आईवर हल्ला केला. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने आधी आईला जमिनीवर पाडलं, नंतर विटेने तिच्यावर हल्ला केला.
हल्ला केल्यानंतर वृद्ध आईने अखेरचा श्वास घेतला. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत प्रकरण समजून घेतलं. संबंधित प्रकरणातील सहयक पोलीस अधीक्षक अधिकारी मेविस टाक यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, वृद्ध महिलेच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हे ही वाचा : बीड: गुंगीचे औषध देत तरुणीला लॉजवर नेलं, नंतर ब्लॅकमेल करत 'तसले' फोटो व्हिडिओ...
मृत वृद्ध महिलेचे पती मनुवा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपीला सोमवारी न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे, मृतदजेह शवविच्छेदनास पाठवला आहे.
ADVERTISEMENT











