Crime News : बिहारमधील कैमूर जिल्ह्यातील कुद्रा शहरात धक्कादायक घटना घडली आहे. जनतेच्या रक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. महिला पोलीस अधिकारी सरिता कुमारी यांच्यावर दुचाकीवरून ड्युटीवर जाताना गोळीबार करण्यात आला. हा हल्ला पहाटे साडेपाच वाजताच्या दरम्यान बजरंग पॅलेसजवळ करण्यात आला.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मूक-बधिर तरुण कामगाराची गोळ्या घालून हत्या, गुन्हेगार मोकाट
महिला पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार
दरम्यान, महिला पोलीस अधिकारी सरिता यांच्यावर गोळीबार केल्यानंतर त्यांच्या पाठीत गोळी लागली. अशावेळी त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रथमिक उपचारानंतर, तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले असून त्यांना बनारसच्या एका प्रतिष्ठित रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नेमकं काय घडलं?
संबंधित प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, सरिता कुमारी मेधपुरहून ड्युटीला जाताना त्यांचे पती गाडी चालवत होते. त्यानंतर ते कुद्रा रेल्वे स्टेशनजवळ पोहोचले असताना त्या ठिकाणी काही लोक एका दुचाकीवरून आले आणि त्यांनी महिला अधिकाऱ्यावर गोळीबार केला.
या हल्ल्यानंतर हल्लेखोर हे घटनास्थळावरून पळून गेले, स्थानिकांनी घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान, कुदरा पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली होती. अशावेळी पोलिसांनी घटनास्थळाहून काही वस्तू जप्त केल्या आहेत.
हेही वाचा : डायरी समोर आली, वर्षभरानंतर कळलं बहिणीचा अंत का झाला... प्रियकरावर गुन्हा दाखल, घटना काय?
दरम्यान, पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. कुदरा पोलीस ठाण्याच्या प्रभारींनी सांगितलं की, प्राथमिक तपासणीत हल्लेखोरांनी पोलीस अधिकाऱ्यावर केलेला हल्ला हा बदला घेण्याचा उद्देश असल्याचं बोललं जात आहे.
ADVERTISEMENT
