तुटलेले दात, चॉकलेट्स आणि 8 वर्षाच्या मुलाचा मृतदेह लाल बॅगत पॅक, हादरवून टाकणारी घटना

Crime News : एका लाल रंगाच्या पेटीत 8-10 वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळल्याचा दिसून आला. मतदेहाव्यतिरिक्त, त्या पेटीमध्ये चिप्स, कुरकुरे आणि चॉकलेट्स देखील आढळून आले होते, नेमकं काय घडलं जाणून घेऊयात.

crime news

crime news

मुंबई तक

• 09:33 AM • 06 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

लाल रंगाच्या पेटीत 8-10 वर्षांच्या मुलाचा मृतदेह

point

पेटीत चिप्स, कुरकुरे आणि चॉकलेट्स आढळले

Crime News : उत्तर प्रदेशातील नोएडात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका लाल रंगाच्या पेटीत 8-10 वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळल्याचा दिसून आला. मतदेहाव्यतिरिक्त, पेटीत चिप्स, कुरकुरे आणि चॉकलेट्स देखील आढळून आले होते. या घटनेवरून असे दिसून आले की, तांत्रिक विधीच्या अंतर्गत मुलाची हत्या करण्यात आली. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. नेमकं काय प्रकरण घडलं ते जाणून घेऊयात. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : अकोल्यात Gen z मुलानं 'त्या' कारणावरून राहतं घर सोडलं, 21 दिवसानंतर 500 किमी अंतरावर.. पोलिसही चक्रावले

नेमकं काय घडलं? 

एसपी बरेली यांनी संबंधित प्रकरणात मुलाच्या मृत्यूमागील गूढ उकलण्याचे काम केले आहे. संबंधित प्रकरणात पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत. डॉक्टरांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. या प्रकरणात अधिकाऱ्यांनी दावा केला की, या संपूर्ण घटनेचा लवकरात लवकर उलगडा होण्याची शक्यता आहे. 

तांत्रिक विधीच्या अंतर्गत मुलाची हत्या

दरम्यान, पोलिसांनी मृतदेहाच्या केलेल्या तपासातून काही खाद्यपदार्थाच्या वस्तूंचा उलगडा झाला होता. तांत्रिक विधीच्या अंतर्गत मुलाची हत्या करण्यात आल्याचा अधिक संशय व्यक्त केला जात आहे. मृतदेह हा नदीत फेकण्याच्या उद्देशाने एका बॉक्समध्ये नदीच्या काठावर आणण्यात आला होता. 

हे ही वाचा : यवतमाळ हादरलं! पत्नीसोबत अनैतिक प्रेमसंबंध, संतापलेल्या नवऱ्याने प्रियकराला एकांतात बोलावून संपवलं

सध्या पोलिसांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि नंतर पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला होता. दरम्यान, प्रकरणाचा शोध घेण्यासाठी बरेली पोलिसांनी मुलाच्या हत्येचं गूढ उकलण्यासाठी पथक तैनात केली आहे. अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, मुलाच्या मृत्यूचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही, पण ते लवकरच समोर येईल. 

    follow whatsapp