लग्न होऊन 8 महिने झालं तरीही डॉक्टर असलेल्या प्रियकराला विसरता येईना, शेवटी नवऱ्याचा काटा काढला; भयंकर कट रचला

मुंबई तक

18 Jan 2026 (अपडेटेड: 18 Jan 2026, 09:49 AM)

Crime News : रामूची पत्नी पप्पी हिने तिचा प्रियकर डॉक्टर चौधरी मोहम्मद तफजील उर्फ मीनू चौधरी आणि त्याच्या साथीदारासह पतीच्या हत्येचा कट रचला होता. हत्येनंतर हा प्रकार अपघात वाटावा, यासाठी मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकण्यात आला. सुरुवातीला पोलिसही या बनावाला बळी पडले होते. मात्र तपासादरम्यान अनेक संशयास्पद बाबी समोर आल्यानंतर पोलिसांनी खोलात चौकशी सुरू केली.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

लग्न होऊन 8 महिने झालं तरीही डॉक्टर असलेल्या प्रियकराला विसरता येईना

point

शेवटी नवऱ्याचा काटा काढला; भयंकर कट रचला

Crime News : सीतापुर जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी रस्त्याच्या कडेला एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. रामू (उर्फ राजू) नावाच्या या तरुणाचा मृत्यू रस्ता अपघातात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला होता. मात्र तपास पुढे जात असताना या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले. रामूचा मृत्यू अपघातात नव्हे, तर अत्यंत निर्दयपणे करण्यात आलेल्या हत्येमुळे झाल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे ही हत्या स्वतः त्याच्या पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून केल्याचा धक्कादायक खुलासा पोलिस तपासात समोर आला आहे.

हे वाचलं का?

रामूची पत्नी पप्पी हिने तिचा प्रियकर डॉक्टर चौधरी मोहम्मद तफजील उर्फ मीनू चौधरी आणि त्याच्या साथीदारासह पतीच्या हत्येचा कट रचला होता. हत्येनंतर हा प्रकार अपघात वाटावा, यासाठी मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकण्यात आला. सुरुवातीला पोलिसही या बनावाला बळी पडले होते. मात्र तपासादरम्यान अनेक संशयास्पद बाबी समोर आल्यानंतर पोलिसांनी खोलात चौकशी सुरू केली.

पोलिस तपासात उघड झाले की, रामू आणि पप्पी यांचा विवाह अवघ्या आठ महिन्यांपूर्वी झाला होता. मात्र पप्पी या लग्नावर समाधानी नव्हती. लग्नानंतरही ती आपल्या प्रियकर मोहम्मद तफजीलशी संबंध ठेवून होती. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 14 जानेवारी रोजी रामू आपल्या सासरी खिचडी कार्यक्रमासाठी गेला होता. रात्री तिथे मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी परतताना पप्पीने तब्येत बरी नसल्याचे सांगत डॉक्टरकडे घेऊन जाण्याची विनंती केली.

हेही वाचा : मुंबई अन् पुणे महानगरपालिकेत विजय मिळवताच मंत्रिमंडळाची बैठक, देवेंद्र फडणवीसांचे 10 धडाकेबाज निर्णय

रामू पप्पीला घेऊन तिच्या प्रियकर असलेल्या डॉक्टरकडे गेला. तिथेच आधीपासूनच रामूच्या हत्येचा कट आखण्यात आला होता. परत येताना खैराबाद टोल प्लाझाजवळ कुंवरपूर परिसरात मोहम्मद तफजील आणि त्याचा साथीदार आनंद कुमार यांनी रामूला अडवले. काही कळायच्या आत तिघांनी मिळून लोखंडी रॉडने रामूवर जबरदस्त हल्ला केला. रामू खाली कोसळल्यानंतर त्याचा मफलरने गळा आवळून हत्या करण्यात आली. पप्पीने स्वतः मफलरने गळा दाबून तो मृत होईपर्यंत पकडून ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

हत्येनंतर पप्पीनेच लोकांना आणि पोलिसांना फोन करून पतीचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र कमलापुर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक इतुल चौधरी यांना या प्रकरणात संशय वाटू लागला. पप्पीची कसून चौकशी केल्यानंतर तिचे पितळ उघड झाले आणि तिने गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी हत्या करण्यासाठी वापरलेली लोखंडी रॉड, मफलर आणि शाल जप्त केली असून पप्पी, तिचा प्रियकर मोहम्मद तफजील उर्फ मीनू चौधरी आणि त्याचा साथीदार आनंद कुमार यांना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. अपघाताचा बनाव करून केलेल्या या हत्येने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसही या क्रूरतेने हादरले आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

बेडरुममध्ये तरुणीचा दोन मुलांसोबत रोमान्स, पतीने रंगेहात पकडलं अन् जागेवर संपवलं, 4 महिन्यांपूर्वीच झालेलं लव्ह मॅरेज