Crime News : उत्तर प्रदेशातील इटावामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. बहिणीचाच नवरा मेहुण्याच्या पत्नीसोबत पळून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी बेपत्ता झालेल्या नवऱ्याने पत्नीची तक्रार नजीकच्या पोलीस ठाण्यात दाखल केली. ही घटना सैफई परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : पुण्यात निवृत्त पोलीस अधिकाऱ्यावर टोळक्यांचा हल्ला, रक्तबंबाळ होईपर्यंत केली बेदम मारहाण
पत्नीला शोधून दिल्यास दहा हजारांचे बक्षीस
पतीने आपल्या पत्नीला आणि मेहुण्याला शोधून दाखवणाऱ्यास 10 हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. जी व्यक्ती शोध घेईल किंवा पत्ता देईल, त्यांनाच ते बक्षीस देण्यात यईल, अशी घोषणा केली.
पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
महिलेच्या पतीने आपली पत्नी बेपत्ता असल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिलेच्या पतीने सांगितलं की, मी एका हाताने अपंग आहे. मी एका विधवा महिलेसोबत विवाह केला. माझा 60 वर्षीय मेहुणा हा गवंडी कामगार असून तो अनेकदा आमच्या घरी यायचा.
त्याने आठवडाभर घराला प्लास्टर केलं होतं. त्या काळात तो माझ्या पत्नीच्या संपर्कात आला होता. संधी साधून पत्नीनं मेहुण्यासोबत पळ काढला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर 24 एप्रिल रोजी बेपत्ता व्यक्तीची तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर पोलीस दोघांचा शोध घेत आहेत.
हेही वाचा : पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीला दिल्या गुंगीच्या गोळ्या, निर्जनस्थळी नेलं अन् सपासप वार करत संपवलं, कारण ऐकून हादरून जाल
पती म्हणाला की, माझ्या मेहुण्यालाही मुले आहेत. तरीही दोघांनीही लाज सोडून दिली आहे. माझ्या पत्नीने माझ्या घरातून रोख रक्कम आणि दागिने नेले आहेत. जो कोणी त्यांचा शोध घेईल त्याला 10 हजार रुपये देण्यात येईल. त्यावेळी पोलिसांनी सांगितलं की, आम्ही गुन्हा दाखल करून ठेवला असून याचा सध्या शोध सुरु आहे. या प्रकरणात लवकरच दोघांनाही अटक केली जाईल. तर दुसरीकडे या प्रकरणाची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.
ADVERTISEMENT
