Crime News : एका प्रसिद्ध मॉडेलचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. मॉडेलचं नाव खुशी अहिरवार असे आहे. लिव्ह इन रिलेशनशिपचे प्रकरण असल्याची माहिती समोर आली आहे. या खूनात तिचाच बॉयफ्रेंड कासिमचे संशयास्पद नाव घेतलं जात होतं. तिच्या मृत्यूनंतर शवविच्छेदनाचा रिपोर्ट समोर आला, त्यात फॅलोपियन ट्यूब फुटल्यामुळेअंतर्गत रक्तस्त्राव झाला, अशातच तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. तिच्या शरीरावर कसल्याही जखमा नाहीत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Weather update : राज्यात 'या' भागात वाहणार थंड वारे, तापमानाचा पारा झटकन घसणार!
नेमकं काय आहे प्रकरण?
ही घटना मध्य प्रदेशातील इंदौर रोड येथील भैंसाखेडी येथे घडली आहे. पोलिसांनी महिलेचा मृतदेह रुग्णालयात ताब्यात घेतले आहे. दरम्यान, शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये सांगितले की, मॉडेलची पॅलोपियन ट्यूब फाटली आहे, त्याचं नेमकं कारण ती वैद्यकीय कारणामुळे की, मारहाणीमुळे फाटली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याची पडताळणी करण्यासाठी व्हिसेरा फॉरेन्सिक तपासणीसाठी रिपोर्ट पाठवण्यात आले आहेत. पोलीस त्या रिपोर्टचीच वाट पाहू लागले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या जबाबात सांगितलं की, तो आणि खुशी उज्जैनहून भोपाळला बसने परतत होते. तेव्हा वाटेतच फांडा टोल प्लाझा येथे त्याने खुशीला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती बेशुद्ध अवस्थेत पडली होती आणि नंतर तिचे शरीर थंडगार पडले होते. त्यानंतर ही परिस्थिती पाहून तिचा बॉयफ्रेंड कासिमने तिला चिरायू रुग्णालयात नेले, तेव्हा उपचार सुरु असताना डॉक्टरांनी मॉडेलला मृत घोषित केले.
दरम्यान, पोलिसांच्या तपासातून असे समोर आले की, खुशी ही पूर्वी एका बँकेत काम करत होती. परंतु काही काळापूर्वी तिने मॉडेलिंग साठी नोकरी सोडली होती. कासिम आणि खिशी हे दोघेही सुमारे दीड ते दोन वर्षांपासून एकमेकांचे मित्र होते.
हे ही वाचा : Delhi Blast नंतर ऑपरेशन सिंदूर-2?, PM मोदींच्या मनात नेमकं काय.. 'या' बैठकीकडे अवघ्या देशाचं लक्ष
खुशीच्या हत्येत बॉयफ्रेंड कासिम अहमदचा हात..
या प्रकरणात आरोपी असा की, खुशीची हत्या तिचा प्रियकर कासिम अहमदने केली. एसीपी आदित्यराज सिंह यांच्या म्हणण्यानुसार, रविवारी आणि सोमवारी रात्रीच्या सुमारास चिरायू रुग्णालयातून पोलिसांना माहिती मिळाली की, दोन तरुण एकाच तरुणी घेऊन आले आहेत, तसेच रुग्णालयात नेण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची माहिती मिळताच खजुरी पोलीस ठाण्याचे घटनास्थळी पोहोचले, जिथे कासिम आणि बंस कंडक्टर उपस्थित होते. या प्रकरणात कासिमची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT











