लेकीच्या पोटात वाढत होतं प्रियकराचं बाळ, तरुणाने लग्नास दिला नकार, अखेर नैराश्यात येऊन तिच्या बापानं संपवलं जीवन

Crime News : आपल्या मुलीसह कारमधून घरी परतणाऱ्या एका वडीलांनी गाडी मध्येच थांबवली आणि नंतर गळफास घेत आत्महत्या केली.

crime news

crime news

मुंबई तक

• 09:00 AM • 06 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

कारमधून घरी परतणाऱ्या एका वडीलांनी गाडी मध्येच थांबवली आणि आत्महत्या केली

point

पोलिसांच्या निष्काळजीपणाला धरलं जबाबदार

Crime News : छत्तीसगढमधील बालोद जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक धक्कादायक घटना घडली. आपल्या मुलीसह कारमधून घरी परतणाऱ्या एका वडीलांनी गाडी मध्येच थांबवली आणि नंतर गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर कुटुंबाने संताप व्यक्त केला आणि त्यांनी आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या या निष्काळजीपणाला जबाबदार धरले आहे. या प्रकरणी आता जाहीर निषेध नोंदवण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : दारू पार्टीत मोठा वाद, मित्राच्या बायकोच्या डोक्यात विटेनं हल्ला करत संपवलं, रात्री धक्कादायक कांड

दोन महिन्यांपूर्वी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल पण अटक नाही

संबंधित प्रकरणात सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला अटक न झाल्याने मृत झालेला व्यक्ती हा
तणावजन्य परिस्थितीत होता. त्याला धमक्या देखील येत होत्या. संतप्त झालेल्या कुटुंबाने मृतदेह पोलीस ठाण्यात नेला. दरम्यान, पोलिसांनी स्टेशनसमोर आधीच बॅरिकेड्स लावले होते. त्यांनी कुटुंबाला स्टेशनवरच थांबवले आणि नंतर तिथेच निषेध नोंदवला होता. 

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार आणि काही नेते यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच कुटुंबाला पाठिंबा देण्यात आला होता. त्यांनी पोलिसांवर कारवाई करण्यात हलगर्जीपणाचा आरोप देखील केला होता. दोन महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना अटक का करण्यात आली नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

हे ही वाचा : अवघ्या 19व्या वर्षी 'दंडक्रम पारायण'! सतत 50 दिवस 2000 वेदमंत्रांचे पठण... अहिल्यानगरच्या महेशने रचला नवा विक्रम

ज्याने तरुणीला गरोदर केलं तिच्याशी विवाह करण्यास नकार

 

दरम्यान, मृताच्या मुलीचे आरोपी तरुणाशी प्रेमसंबंध होते. याचदरम्यान, मुलगी गर्भवती राहिली होती. तेव्हा कुटुंबाने तरुणाला तिच्याशी विवाह करण्यास सांगितला. पण, त्याने विवाहास नकार दिला होता. मुलीला आणि नंतर तिच्या वडिलांना मारहाण करण्यास सुरुवात देखील करण्यात आली. या प्रकरणात मृताच्या भावाचे म्हणणे आहे की, आरोपी कुटुंबाला सतत धमकावत होता. पोलिसांनी कारवाई करूनही कोणतीही माहिती मिळाली नाही. मृत तरुण अनेक दिवसांपासून मानसिक दबावात होता, नंतर त्याने आत्महत्या करत जीवन संपवलं. 

    follow whatsapp