नवरा बाहेरगावी नोकरीला, सासऱ्याने लेकीसारख्या सुनेला... लाज आणणारी घटना

Crime News : सासऱ्याने आपल्या सुनेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली. पीडित सुनेनं आरोप केला की, विनयभंग करताना अनेकदा विरोध केला असता, तिला सासरच्या घरातून बाहेर काढण्यात आले.

crime news

crime news

मुंबई तक

29 Jun 2026 (अपडेटेड: 29 Jun 2026, 06:43 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नवरा रोजगारासाठी बाहेर अन् सासऱ्यानेकडून सुनेचा छळ

point

पीडितेला सासरहून दिलं हकलून

Crime News : सासरा म्हणजे वडील असतात, मात्र याच वडिलांसारख्या सासऱ्याची सुनेवर वाईट नजर होती. सासऱ्याने आपल्या सुनेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली. पीडित सुनेनं आरोप केला की, विनयभंग करताना अनेकदा विरोध केला असता, तिला सासरच्या घरातून बाहेर काढण्यात आले. पंचायतीनुसार, हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला होता. आरोपींनी हत्यार आणि इतर शस्त्रांनी हल्ला केला होता. ज्या हल्ल्यात महिला गंभीररित्या जखमी झाली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बायकोच्या पोटात बाळ, डोहाळेजेवणादरम्यान नवऱ्याचा संशय, DNA ची मागणी अन्..

नवरा रोजगारासाठी बाहेर अन् सासऱ्याने.. 

पीडित महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत पीडितेनं दाखल केलं की, नवरा रोजगारासाठी बाहेर गेला होता. सुनेचाच नवरा तिच्यासोबत नाही, हे पाहून सासऱ्याचीच नियत बिघडली. पीडितेला घरात एकटं पाहून सासऱ्याने तिचा छळ केला, पण त्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. यानंतर तिने आपल्या नवऱ्याला घडलेला सर्व प्रकार सांगितला. 

पीडितेला सासरहून दिलं हकलून

पतीनं सांगितलं की, महिला आपल्या माहेरी जाण्यासाठी तयार होती. तेव्हा करमा गावातील समसुद्दीन अंसारी, रुस्तम अंसारी, गुलाबुद्दीन अंसारी, सनसीर अंसारी, काश्मीर अंसारी, जाविद अंसारी, संजीद अंसारी तथा रामडीह नसीम अंसारीने तिला घरातून काढून टाकले, नंतर तिच्या कपड्यांचं सामान देखील फेकून दिलं. 

पीडितेच्या माहितीनुसार, 27 जून रोजी सकाळी पंचायतच्या माध्यमातून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न होता, ही पंचायत पीडितेच्या माहेरी होणार होती. अशातच माहेरी काही लोक हत्यार घेऊन गेले. तेव्हा तलवारीच्या सहाय्याने हल्ला करण्यात आला. ज्यात महिला गंभीर स्वरुपात जखमी झाली. 

हे ही वाचा : दारूच्या नशेत तरुण, कुऱ्हाडीने हल्ला करत वडिलांची निर्घृण हत्या

मध्यस्ती करण्यासाठी आलेल्या लोकांना देखील जबर मार लागला. घराची तोडफोड देखील झाली. पोलिसांनुसार, आरोपीवर एफआरआय दाखल करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.