सासऱ्याने सुनेला दारू पाजून केले लैंगिक अत्याचार, तीन दिवस एका खोलीत बंद ठेवलं

मुंबई तक

• 09:00 AM • 09 Jul 2026

crime news : वासनेनं बरबटलेल्या सासऱ्याने आपल्या सोन्यासारख्या सुनेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली. सुनेसोबत अश्लील कृत्य केल्याची घटना समोर आल्यानंतर तो अनेक दिवस पोलिसांपासून आपला बचाव करत होता. एका खबरीने आरोपीचे ठिकाण सांगितले असता, पोलिसांनी आरोपीला अटक केली

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सुनेला सासरी मारहाण अन् दारू पाजली

point

नशेचे पदार्थ पाजून सुनेवर लैंगिक अत्याचार 

Crime News : उत्तर प्रदेशातील वासनेनं बरबटलेल्या सासऱ्याने आपल्या सोन्यासारख्या सुनेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली. या प्रकरणातील आरोपीची मुकेश तिवारी (वय 58) अशी ओळख समोर आली. सुनेसोबत अश्लील कृत्य केल्याची घटना समोर आल्यानंतर तो अनेक दिवस पोलिसांपासून आपला बचाव करत होता. एका खबरीने आरोपीचे ठिकाण सांगितले असता, पोलिसांनी आरोपी मुकेश तिवारीच्या मुसक्या आवळल्या. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : केतन अग्रवालच्या हत्येपूर्वी सियानं बरंच काही केलं सर्च, पोलिसांनी डोकं धरलं

सुनेला सासरी मारहाण अन् दारू पाजली

पोलिसांच्या माहितीनुसार, तिवारी हा रेल्वे विभागात सीनियर इंजीनियर या पदावर काम करतो. तक्रारीत नमूद केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित सुनेची नोव्हेंबर 2023 मध्ये आरोपी इंजीनियचा मुलगा अभिषेक तिवारीसह विवाह झाला होता. काही दिवसानंतर तिला हुंड्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. पीडितेनं आरोप केला की, सासरी मला मारहाण करण्यात आली होती. नंतर जबरदस्ती दारू पाजण्यात आली होती. मानसिक आणि शारिरीक त्रास देण्यात आला.  

नशेचे पदार्थ पाजून सुनेवर लैंगिक अत्याचार 

सुनेनं आरोप केला की, 20 एप्रिल 2024 रोजी ती आपल्या माहेरी गेली. तिच्या सासऱ्याने तिला जबरदस्ती नशेचे पदार्थ पाजून बेशुद्ध केले. नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, तिला तीन दिवस एका खोलीत बंद करून ठेवल्याचा आरोप करण्यात आला. 

आपल्या तक्रारीत महिलेनं आरोप केला की, लग्नाच्या रात्री झालेल्या पार्टीत नणंदेसह नवऱ्याने पार्ट्या केल्या, तेव्हा महिलेनं सासऱ्याकडे याबाबत तक्रार केली. तेव्हा सासऱ्याने सांगितलं की, अशा पार्ट्या या श्रीमंतांच्या घरी छंद म्हणून साजऱ्या केल्या जातात. 

हे ही वाचा : केतनच्या हत्येपूर्वी सियाचे चेतनशी सिक्रेट लग्न, साक्षीदार म्हणून मित्रांची स्वाक्षरी

हुंडा, छळ मारहाण आणि धमकीशी संबंधित कलमांन्वये आरोपींवर गुन्हा

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी हुंडा, छळ मारहाण आणि धमकीशी संबंधित कलमांन्वये आरोपींवर गुन्हा दाखल केला. या आरोपींमध्ये पती आणि सासऱ्यांचा समावेश होता. नवीन पुरावे आढळून आल्यानंतर लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले. यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी परिसरात जाऊन तपास करत आरोपीला अटक केली.