Crime News : नात्याला काळिमा फासणारी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सरकारी नोकरी आणि कोट्यवधींची प्रॉपर्टी मिळवण्याच्या हव्यासापोटी एका मुलीने आपल्याच सख्ख्या आईच्या हत्येचा कट रचल्याचे उघड झाले आहे. आरोपी मुलीने चुलता आणि चुलत भावाच्या मदतीने आईचा काटा काढण्यासाठी तब्बल 7 लाख रुपयांची सुपारी दिली होती. 3 जुलै रोजी सायंकाळी भरधाव स्कॉर्पिओने चिरडून 45 वर्षीय नीरज शर्मा यांची हत्या करण्यात आली. सुरुवातीला हा अपघात वाटत असला, तरी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला असता हा सुनियोजित खून असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार मुलीसह सात आरोपींना अटक केली असून, एक जण अद्याप फरार आहे.
ADVERTISEMENT
वडिलांची नोकरी मिळावी अशी इच्छा
राजस्थानची राजधानी जयपूरमधील ही घटना आहे. मृत नीरज शर्मा या जयपूर न्यायालयात एलडीसी (लॉवर डिव्हिजन क्लर्क) पदावर कार्यरत होत्या. गेल्या वर्षी त्यांच्या पतीचे निधन झाले होते, त्यानंतर अनुकंपा तत्त्वावर त्यांना ही सरकारी नोकरी मिळाली होती. मात्र, त्यांची मुलगी आयुषी शर्मा हिची नजर आईची नोकरी आणि कुटुंबाच्या मालमत्तेवर होती. वडिलांच्या निधनानंतर ही नोकरी आपल्याला मिळावी अशी आयुषीची इच्छा होती, पण आई स्वतः कामावर रुजू झाल्यामुळे त्यांच्यात गेल्या दोन-तीन वर्षांपासून सतत वाद होत होते. अखेर आईला रस्त्यातून हटवून अनुकंपा नोकरी आणि संपत्ती दोन्ही हडपण्याच्या उद्देशाने आयुषीने आपल्या नातेवाईकांसह मिळून या क्रूर हत्येचा कट आखला.
हे ही वाचा : Monsoon Update : 20 वर्षांचा विक्रम मोडला, अतिमुसळधार पाऊस, डेटाच सांगतोय!
आईला संपवण्यासाठी 7 लाखांची सुपारी
या हत्येसाठी आयुषीने तिचा चुलता मोहन स्वरूप आणि चुलत भाऊ बलराम उर्फ रवी यांच्याशी हातमिळवणी केली होती. त्यांनी भरतपूर येथील हेमंत शर्मा नावाच्या गुंडाला 7 लाख रुपयांची सुपारी दिली. नीरज शर्मा यांच्या दैनंदिन हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आरोपींनी सुरुवातीला एक थार गाडी भाड्याने घेतली आणि अनेक दिवस रेकी केली. तब्बल महिनाभर पाळत ठेवल्यानंतर, 3 जुलै रोजी जेव्हा नीरज शर्मा आपल्या मुलाला कोचिंग क्लासमधून सोडून घरी परतत होत्या, तेव्हा 130 किमी प्रतितास वेगाने आलेल्या स्कॉर्पिओने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की नीरज यांचा मृतदेह 100 फूट दूर जाऊन पडला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या गुन्ह्यात सहभागी असलेले मोहित शर्मा, रोहित जाटव, आकाश शर्मा आणि अरविंद शर्मा हे सर्वजण घटनास्थळी वेगवेगळ्या भूमिका बजावत गुन्ह्यात मदत करत होते.
हे ही वाचा : सातारा : विजेच्या धक्क्याने सगळं कुटुंब संपलं, एकमेकांना वाचवताना काळाचा घाला
मुलीने कबूल केला गुन्हा
नीरज शर्मा यांच्या मृत्यूनंतर त्यांचे भाऊ राकेश कुमार शर्मा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांनी सांगितले की, त्यांची बहीण आधीपासूनच मुलगी आयुषी, सासरची मंडळी आणि दीराच्या मुलाकडून मालमत्तेसाठी होणाऱ्या त्रासाबद्दल बोलत होती, तसेच तिला जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या होत्या. पोलिसांनी कसून चौकशी केली असता आयुषीने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी आयुषी शर्मा, मोहन स्वरूप, मोहित शर्मा, आकाश शर्मा, अरविंद शर्मा, हेमंत शर्मा आणि रोहित जाटव यांना अटक केली आहे, तर या कटात महत्त्वाचा दुवा असलेला चुलत भाऊ बलराम उर्फ रवी हा अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT












