पोलीस खात्याला काळिमा, अल्पवयीन मुलीवर पीएसआयने केला बलात्कार

मुंबई तक

07 Jul 2026 (अपडेटेड: 07 Jul 2026, 12:14 PM)

पोलीस खात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली एका पीएसआयला अटक करण्यात आली आहे. कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यात ही घटना घडली.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पोलीस खात्याला काळिमा

point

अल्पवयीन मुलीवर पीएसआयने केला बलात्कार

Crime News : पोलीस खात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली एका पोलीस उपनिरीक्षकाला (PSI) अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलीस विभागाने तात्काळ कारवाई करत आरोपी पोलीस उपनिरीक्षकाला तातडीने निलंबित केले आहे. पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या तक्रारीनंतर रविवारी (5 जुलै) आरोपी पोलीस अधिकाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या असून, विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत तो निलंबित राहील. कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

हॉटेलमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार

पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीने 4 जुलै रोजी पोलिसात तक्रार दाखल केली होती. तिने आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की, आरोपी पोलीस उपनिरीक्षक तिला फसवून आपल्या एका नातेवाईकाच्या घरी सुरू असलेल्या वाढदिवसाच्या पार्टीत घेऊन गेला होता. त्यानंतर त्याने तिला एका हॉटेलमध्ये नेले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या धक्कादायक घटनेनंतरही आरोपी उपनिरीक्षक सातत्याने तिच्या मोबाईलवर संपर्क साधून तिला त्रास देत होता, असाही आरोप पीडितेने केला आहे.

हे ही वाचा : रत्नागिरी : खेडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना, डोंगराचा कडा खचला अन् क्षणात सर्व काही संपलं!

सीसीटीव्ही फुटेजमधून सत्य समोर

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीच्या आधारे आरोपी पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पीडितेच्या आरोपांना पुष्टी मिळाली. या फुटेजच्या आधारे आरोपीची कसून चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

हे ही वाचा : मुंबई : अचानक उघडला लिफ्टचा दरवाजा अन् घडलं भयानक, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार?

कायदेशीर कारवाई

पोलीस प्रशासनाने या संवेदनशील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास वेगवान केला आहे. सध्या पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाच्या प्रत्येक बाजूची बारकाईने तपासणी करत असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.