मुलगी तरुणाला भाऊ मानायची, मैत्रिणीच्याच भावाने केला लैंगिक अत्याचार

मुंबई तक

• 08:00 AM • 09 Jul 2026

Crime News : मैत्रिणीच्या भावाने अपहरण करून पीडितेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. पीडित मुलगी ही आरोपीला भाऊ मानत होती. या पवित्र नात्याला काळिमा फासणारा प्रकार उघडकीस आला. आरोपीने पीडितेला वासनेचं बळी बनवलं, या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला.

crime News

crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मित्राच्या बहिणीवर लैंगिक अत्याचार

point

रात्री 1 वाजता फोन करून बाहेर बोलावलं नंतर.. 

Crime News : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरहून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मैत्रिणीच्या भावाने अपहरण करून पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलगी ही आरोपीला भाऊ मानत होती. या पवित्र नात्याला काळिमा फासणारा प्रकार उघडकीस आला. आरोपीने पीडितेला वासनेचं बळी बनवलं, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु ठेवला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'रामाच्या नावावर सत्ता मिळवली, अन् आता…’, रामरक्षा आंदोलनात ठाकरे संतापले!

पीडिता आरोपीला भाऊ मानायची

घडलेल्या घटनेनुसार, पीडित विद्यार्थिनी माधोगंजड पोलीस ठाणे परिसरात तिच्या वद्ध आजीसोबत राहते, तर तिचे आई-वडील रोजगारासाठी राजस्थान येथे राहतात. आरोपी हा पीडितेच्या मैत्रिणीचा भाऊ असून त्याची लोकेश विश्वकर्मा अशी ओळख पटली. पीडित मुलगी लोकेंद्रला भाऊ मानायची, पण त्याने याचा गैरफायदा घेत तिच्याशी नको तेच केलं. 

मित्राच्या बहिणीवर लैंगिक अत्याचार

आरोपी लोकेंद्र पीडितेच्या घरात जायचा. त्याने त्या विद्यार्थिनीचा छळ करण्यास सुरुवात केली. अल्पवयीन मुलीने विरोध केल्यास आरोपीने आजीला जीवे मारण्याची धमकी दिली, यामुळे ती घाबरून शांतच सर्व सहन करत राहिली. पोलिसांनी तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, हा छळ काही महिन्यांपासून सुरु होता. आरोपीने घरात जबरदस्ती प्रवेश करून आजीला मारहाणीची धमकी दिली. नंतर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला.

रात्री 1 वाजता फोन करून बाहेर बोलावलं नंतर.. 

आरोपीने पीडितेला रात्री 1 वाजता फोन करून बाहेर बोलावलं, नंतर पीडितेनं येण्यास नकार दिल्याने आरोपीने घरात घुसण्याची धमकी दिली. पीडिता भयभीत होऊन घराबाहेर आली. आरोपीने तिला बाईकवर बसवून कलापी ब्रिज कॉलनी परिसरात नेत एका भाड्याच्या रुममध्ये ओलीस ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. 

हे ही वाचा : 'गुन्हे धुण्याचे वॉशिंग मशीन, राज्यात काय सुरु आहे?', पक्षांतरावरुन हायकोर्टाचे संतप्त सवाल

सततच्या धमकी, शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून पीडितेने अखेर हिंमत दाखवून माधोगज पोलीस ठाणे गाठून आरोपीची तक्रार दाखल केली. तिने पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. पीडितेच्या जबाबानुसार पोलिसांनी लोकेंद्र विश्वकर्मा विरोधात अपहरण, लैंगिक अत्याचार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला.