Crime News : एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी पत्नीचा छळ करून हत्या केल्याप्रकरणी एका बीडीओला (गटविकास अधिकारी) अटक करण्यात आली होती. यानंतर आता त्याची प्रेयसी असलेल्या एका महिला पोलीस उपनिरीक्षकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बीडीओच्या पत्नीच्या हत्येमध्ये या महिला उपनिरीक्षकाची नेमकी काय भूमिका होती, याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या बीडीओकडून दोन मोबाईल जप्त केले असून त्यांच्या कॉल डिटेल्सची (CDR) कसून तपासणी केली जात आहे. प्राथमिक तपासात बीडीओचे या महिला पोलिसासोबत गेल्या अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ADVERTISEMENT
पीएसआयसोबत विवाहबाह्य संबंध अन् पत्नीचा छळ
बिहारच्या मुझफ्फरपूर भागातील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीडीओ मनोजकुमार यांचे एका महिला पीएसआयसोबत विवाहबाह्य संबंध होते. याच संबंधांमुळे बीडीओ मनोज कुमार आणि त्यांची पत्नी अमृता यांच्यात रोज भांडणे होत होती आणि त्यातूनच अमृता हिचा छळ केला जात होता. मृताच्या भावाने पोलिसात दिलेल्या तक्रारीतही बीडीओ पतीचे दुसऱ्या एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा स्पष्ट उल्लेख केला होता. हे संपूर्ण प्रकरण 3 जुलैच्या रात्री घडले असून, संशयास्पद परिस्थितीत अमृता कुमारी हिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अमृताचा भाऊ राजकुमार याने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
हे ही वाचा : ‘एक डॉक्टर म्हणून मी…’, महिला डॉक्टरला मारणाऱ्या शिंदेंच्या नगरसेवकावर श्रीकांत शिंदेंची वक्रदृष्टी
10 लाखांची मागणी
तक्रारीनुसार, अमृताचा विवाह 9 डिसेंबर 2022 रोजी मनोज कुमार याच्याशी झाला होता. लग्नानंतर वर्षभर सर्व काही ठीक चालले होते, मात्र त्यानंतर बीडीओ पती, सासरा, सासू, दीर अमन कुमार आणि नणंद आरती कुमारी यांनी मिळून अमृताकडे 10 लाख रुपयांची मागणी सुरू केली आणि पैसे देण्यास असमर्थता दर्शविल्यावर तिला अमानुष मारहाण केली जात होती.
हे ही वाचा : Monsoon Update : 20 वर्षांचा विक्रम मोडला, अतिमुसळधार पाऊस, डेटाच सांगतोय!
विष देऊन हत्या
भाऊ राजकुमार यांनी सांगितले की, 3 जुलैच्या रात्री त्यांना अमृताला सासरच्या लोकांनी विष दिल्याची माहिती मिळाली. जेव्हा ते तातडीने मुझफ्फरपूरला पोहोचले, तेव्हा घरात कोणीच नव्हते. शेजाऱ्यांनी सांगितले की तिला सदर रुग्णालयात नेण्यात आले आहे. राजकुमार यांनी रुग्णालयात जाऊन पाहिले असता, अमृताचा मृतदेह एका रुग्णवाहिकेमध्ये पडलेला होता आणि बीडीओ पतीसह सासरचे सर्व लोक तिथून फरार झाले होते. यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली आणि मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
हे ही वाचा : 7 लाखांची डील अन् गेम ओव्हर! सरकारी नोकरीसाठी लेकीनं आईचा घेतला जीव
महिला पीएसआयला अटक
या हत्येनंतर पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवून मुख्य आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आणि आता त्याच्या गुन्ह्यात साथ देणाऱ्या प्रेमिकेलाही गजाआड केले आहे. पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान बीडीओ आणि महिला उपनिरीक्षकाचे प्रेमप्रकरण पूर्णपणे समोर आले आहे. या प्रकरणातील सर्व महत्त्वाच्या मुद्यांवर पोलीस सखोल तपास करत आहेत. या भीषण घटनेनंतर बीडीओ मनोज कुमारचे आई-वडील, भाऊ आणि बहीण हे सर्वजण घरातून फरार झाले असून, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची वेगवेगळी पथके ठिकठिकाणी सातत्याने छापेमारी करत आहेत.
ADVERTISEMENT












