चौघांनी मिळून तरुणाला मारहाण केली, नंतर रेल्वेखाली फेकले; दोन्ही पाय... भयंकर घडलं

मुंबई तक

• 02:27 PM • 09 May 2026

Crime News : तरुणाने युवकाला बेदम मारहाण केली, त्यानंतर तो तरुण बेशुद्ध पडला होता. काही तरुणांनी त्याला ताब्यात घेतले आणि एका रेल्वेखाली फेकून दिले, नंतर आरोपींनी घटनास्थळावरून धाव घेतली. सुरुवातीला तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा बनाव रचण्यात आला, नंतर पीडितेच्या वक्तव्यावरून आणि सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर हा गुन्हा त्याच्या मित्रानेच केल्याचा उघड झाला आहे. 

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

तरुणाला रेल्वेखाली फेकून आत्महत्येचा रचला बनाव

point

रेल्वेची धडक आणि तरुणाचे दोन्ही पाय निकामी

Crime News : तरुणाने युवकाला बेदम मारहाण केली, त्यानंतर तो तरुण बेशुद्ध पडला होता. काही तरुणांनी त्याला ताब्यात घेतले आणि एका रेल्वेखाली फेकून दिले, नंतर आरोपींनी घटनास्थळावरून धाव घेतली. सुरुवातीला तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा बनाव रचण्यात आला, नंतर पीडितेच्या वक्तव्यावरून आणि सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर हा गुन्हा त्याच्या मित्रानेच केल्याचा उघड झाला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : सांगली हादरली, दुहेरी हत्याकांडातील मुख्य साक्षीदाराचा सुपारी देऊन खून; 24 तासात उलगडा

तरुणाला रेल्वेखाली फेकून आत्महत्येचा रचला बनाव

जखमी झालेल्या व्यक्तीवर सफदरगंज रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. शुक्रवारी त्याचा उजवा पाय कापण्यात आला होता, तर डाव्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पीडित व्यक्तीच्या कुटुंबीयांचा आरोप असा की, आरोपींनी त्यांच्या मुलाचे पाय दगडाने ठेचून रेल्वे रुळावर ठेवले, रेल्वेखाली आत्महत्या केल्याचा तो बनाव रचण्यात आला होता. 

रेल्वेची धडक आणि तरुणाचे दोन्ही पाय निकामी

पोलिसांनी दिलेल्या जबाबात, त्या तरुणाने त्याच्या चार मित्रांना मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. पोलिसांनी मित्रांना बोलावून चौकशी करण्यात आली आहे. जखमी व्यक्तीची ओळख मोहित अशी पटली आहे. रेल्वे पोलीस उपआयुक्त भरत रेड्डी यांनी सांगितले की, 26 एप्रिल रोजी भाजी मंडई रेल्वे स्थानक पोलिसांनी माहिती दिली की, आदर्शनगर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेची धडक बसल्याने व्यक्ती जखमी झाला असून त्याचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. 

हे ही वाचा : 116, 117 की 118..., थलपती विजय यांना किती आमदारांचा पाठिंबा? राजभवनातील सूत्रांनी आकडा सांगितला

दरम्यान, या प्रकरणातील जखमी व्यक्तीची ओळख मुकुंदपूर येथील रहिवासी, मोहित (वय 24) अशी ओळख पटली आहे. तर पीडित व्यक्तीचा आरोप केला की, दारूच्या नशेत असलेल्या त्याच्या चार मित्रांनी त्याला माराहाण केली. शुद्धीवर आल्यावर, तो स्वत:ला एका रेल्वे रुळाजवळ आढळला, जिथून त्याला रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावून प्रकरणाची पुढील कारवाईचे काम सुरू आहे.