24 वर्षीय तरुणीला जंगलात नेलं, तोंडावर कापड टाकत चौघांनी..

मुंबई तक

16 Jun 2026 (अपडेटेड: 16 Jun 2026, 02:26 PM)

Crime News : पोलीस ठाणे परिसरात एका 24 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आरोपीचा शोध घेतला जातोय. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

आरोपीसह साथीदारांनी मिळून पीडितेला जंगलात नेले

point

आरोपीसह तिघांनी मिळून पीडितेवर जंगलात लैंगिक अत्याचार 

Crime News : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील चरथावल पोलीस ठाणे परिसरात एका 24 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आरोपीचा शोध घेतला जातोय. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : कल्याण: हुंडा न दिल्यानं सुनेचं मुंडन केलं, उकळतं पाणी टाकून..

आरोपीसह साथीदारांनी मिळून पीडितेला जंगलात नेले

पीडितेच्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी उमर नावाच्या तरुणाने पीडितेला फोन केला होता. नंतर त्याने तिला बेदम मारहाण केली. तिने त्याला सांगितलं की, त्याची आई ही गवत कापण्यास गेली होती. त्यानंतर शेतात उमर त्याच्या चार मित्रांसोबत घटनास्थळी पोहोचला होता.  या प्रकरणात असा आरोप करण्यात आला की, तरुणांनी मादक पदार्थात भिजवलेला रूमाल पीडितेच्या तोंडावर टाकून तिला बेशुद्ध केलं. नंतर आरोपीसह साथीदारांनी मिळून पीडितेला जंगलात नेले. 

आरोपीसह तिघांनी मिळून पीडितेवर जंगलात लैंगिक अत्याचार 

पीडितेनं केलेल्या आरोपानुसार, आरोपीसह तिघांनी मिळून पीडितेला जंगलात नेऊन लैंगिक अत्याचार केला. त्यापैकी दोघेजण पहारा देत थांबले होते. गुन्हा दाखल केल्यानंतर सर्व आरोपींनी घटनास्थळावरून धाव घेतली. त्याच रात्री उशिराने पोलिसांना संशयास्प परिस्थितीत जंगलातून ताब्यात घेतले आणि तिला तात्काळपणे वैद्यकीय तपासणीस रुग्णालयात पाठवले. 

हे ही वाचा : समजून घ्या : 6 खासदारांमुळे एकनाथ शिंदेंना कोणता जॅकपॉट?

प्रकरण लक्षात घेत, मुझफ्फरनगर पोलिसांनी तात्काळपणे कारवाई सुरू केली. पीडितेच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीतून पोलिसांनी गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, काही पथकने सातत्याने प्रकरणाचा शोध घेत आहेत.