गुंडांनी गाडी आडवत शिक्षिकेच्या कपाळातच गोळी घालत संपवलं, शिक्षिका रक्ताच्या थारोळ्यात, हादरवणारं प्रकरण

Crime News : दोन दुचाकीस्वार हल्लेखोरांनी शाळेत जाणाऱ्या एका 28 वर्षीय शिक्षिकेवर गोळीबार करत हत्या केली.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 02:15 PM • 04 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

दुचाकीस्वार हल्लेखोरांनी शिक्षिकेवर केला गोळीबार

point

प्राथमिक उपचार सुरु असताना मृत्यू

Crime News : बिहारच्या अररिया जिल्ह्यात, दोन दुचाकीस्वार हल्लेखोरांनी शाळेत जाणाऱ्या एका 28 वर्षीय शिक्षिकेवर गोळीबार करत हत्या केली. मृत शिवारी कुमारी एका माध्यमिक शाळेत शिक्षिकेचं काम करत होती. या प्रकरणात स्थानिकांनी जखमी शिक्षिकेला फोर्ब्सगंज उपविभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच जिथे तिचा प्राथमिक उपचार करताना मृत्यू झाला. माहिती मिळताच फॉर्ब्सगंजचे एसडीपीओ मुकेश कुमार शहा, नरपतगंज पोलीस ठाण्यासह घटनास्थळी आणि रुग्णालयात पोहोचले आणि घटनेची माहिती घेतली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पाच मुलांच्या आईचा भंगारवाल्यावर जीव जडला, नवऱ्यासमोरच उरकला विवाह, पहिला नवरा म्हणाला...

शिक्षिका शिवानी कुमारी अररिया जिल्ह्यातील नरपतगंज जिल्ह्यातील सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. ती फॉर्ब्सगंजहून नरपतगंज खबादाह कन्हैली माध्यमिक शाळेत जात असे. बुधवारी ती सकाळी 9 वाजताच्या दरम्यान, तिच्या स्कूटीवरून शाळेत जात होती.

गुंडांनी शिक्षिकेला घेरून कपाळावर केला गोळीबार 

नंतर शिव मंदिराजवळ असलेल्या एका दुकानाजवळ, दुचाकीवरून आलेल्या दोन गुंडांनी तिची स्कूटर थांबवली, प्रथम तिचे हेल्मेट काढायला लावले. नंतर अचानकपणे गोळीबार केला. गुंडांनी तिला घेरलं आणि तिच्या कपाळावर गोळी घातली. त्यानंतर शिक्षका तिथेच जमिनीवर कोसळली. तेव्हा घटनास्थळी आलेल्या गुंडांनी घटनास्थळावरून पळ काढला. 

हे ही वाचा : दत्त जयंती निमित्त 'या' राशीतील लोकांवर राहणार कृपादृष्टी, फक्त 'हे' करा सर्व संकट अपसूक होतील दूर

शिवानी रक्ताच्या थारोळ्यात 

गोळीबाराचा आवाज ऐकू येताच गावकरी घटनास्थळी धावले. त्यांना शिवानी कुमारी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली. तेव्हा जखमी शिक्षिकेला उचलून तातडीने उपविभागीय रुग्णालयात नेले, तेव्हा तिच्यावर उपचार सुरु असताना मृत्यू झाला. तेव्हा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी उपविभागीय रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

    follow whatsapp