पत्नीचं मुंडकं फ्रिजमध्ये, कुत्र्यांना शरीराचे तुकडे देणार होता, 'शुगर डॅडी' आणि निघृण हत्या

मुंबई तक

• 07:44 AM • 12 Sep 2026

Crime News : गुवाहाटीच्या हाटीगाव परिसरात महिलेच्या निर्घृण हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्येनंतर महिलेचे मुंडकं फ्रिजमध्ये ठेवण्यात आल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पत्नीचं मुंडकं फ्रिजमध्ये, कुत्र्यांना शरीराचे तुकडे देणार होता

point

'शुगर डॅडी' आणि निघृण हत्या

Crime News : गुवाहाटीच्या हाटीगाव परिसरातील बसिष्ठपूर बायलेनमध्ये महिलेची क्रूरपणे हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. रामानुजन आणि त्याची पत्नी रिया एका भाड्याच्या घरात राहत होते. सहा महिन्यांपूर्वीच दोघांचं लग्न झालं होतं. रिया फॅन्सी बाजारमधील एका बुटीकमध्ये काम करत होती, तर रामानुजन कॅब ड्रायव्हर आहे. 6 सप्टेंबरला या परिसरातील नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केली. रामानुजन आणि रिया राहत असलेल्या इमारतीतून दुर्गंधी येत असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. दोघेही दोन दिवसांपासून दिसले नसल्याचं शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं. सोमवारी दोघांमध्ये जोरदार भांडण झालं होतं. त्यानंतर संध्याकाळी आठ वाजता रामानुजन घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर तो पुन्हा घरी आला नसल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

हेही वाचा : 'शर्करावगुंठित'.., विद्यानंद बापटांनी पेटऱ्यातून नवा शब्द काढला, अर्थ आहे तरी काय?

मृतदेहाचं धड आणि मुंडक वेगळं

या माहितीनंतर पोलिसांनी रामानुजन आणि रिया राहत असलेल्या घराची पाहणी केली. दोघांचेही मोबाईल फोन बंद असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. घराची पाहणी केल्यानंतर पोलिसांना धक्कादायक दृश्य दिसलं. घरात एक मृतदेह आढळून आला. मृतदेहाचं धड आणि मुंडक वेगळं होतं. एका प्लास्टिकच्या पिशवीत मुंडक ठेवून ते फ्रिजरमध्ये ठेवण्यात आलं होतं. पोलिसांनी ओळख पटवल्यानंतर हा मृतदेह रियाचा असल्याचं समोर आलं. रियाच्या हाताची बोटंही कापण्यात आल्याचं तपासात आढळलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार रियाची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. मृतदेह सापडण्याच्या 24 ते 48 तास आधी रियाची हत्या झाली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.

हेही वाचा : वेदर रिपोर्ट : मराठवाड्याला दिलासा मिळणार? कोणत्या तारखांना मुसळधार पाऊस?

रियाच्या शरीराचे तुकडे कुत्र्यांना खाऊ घालण्याचा विचार

फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून रक्ताचे डाग आणि इतर पुरावे जमा केले. त्याचबरोबर घटनास्थळावरून दाऊ हे हत्यारही पोलिसांना सापडलं. आसाममध्ये झाड कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या हत्यारानेच रियाच्या शरीराचे तुकडे करण्यात आले असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. आधी रियाची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर तिचं मुंडक छाटून शरीराचे तुकडे करण्यात आले असावेत, असं पोलिसांना वाटत आहे. या प्रकरणात रामानुजनने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. काही माध्यमांच्या माहितीनुसार, त्याने पत्नीच्या हत्येची कबुलीही दिली आहे. पोलिसांच्या सुरुवातीच्या तपासात रियाला मारल्यानंतर रामानुजनने त्याच घरात जेवण शिजवलं आणि तिथेच जेवण केल्याचं समोर आलं आहे. रियाच्या शरीराचे तुकडे कुत्र्यांना खाऊ घालण्याचा त्याचा विचार होता, अशीही माहिती समोर आली आहे. मात्र, त्याने मृतदेहाची विल्हेवाट का लावली नाही, याचा तपास पोलीस करत आहेत.

या हत्येमागे रियाच्या कथित ‘शुगर डॅडी’चा संबंध असल्याचा पोलिसांचा संशय आहे. पोलिसांच्या चौकशीत रामानुजनने शिक्षा संपवून परतल्यानंतर रियाने ज्याला ‘शुगर डॅडी’ म्हटलं होतं, त्याला शोधून मारणार असल्याचं सांगितल्याची माहिती आहे. रियाचे वयाने मोठ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते का आणि त्याची माहिती रामानुजनला होती का, याचा पोलीस तपास करत आहेत. केवळ संशयावरून ही हत्या करण्यात आली का, याचाही तपास सुरू आहे. घटनेनंतर दोन दिवस रामानुजन इथे-तिथे फिरत राहिला असल्याची माहिती आहे. त्याचा तो शुगर डॅडीच्या मागावर होता का, याचाही पोलीस तपास करत आहेत. रामानुजनवर त्याच्या मूळगावी एटीएम मशीन चोरीचा गुन्हा दाखल असल्याचंही समोर आलं आहे. त्याच्याकडून दोन मोबाईल फोन सापडले असून त्यातूनही पुरावे मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. Ria आणि Ramanujan यांच्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लग्नानंतर घडलेल्या या हत्येने गुवाहाटीत चर्चेला उधाण आलं आहे. मृतदेहाचे तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवण्यात आल्याने या प्रकरणाची तुलना श्रद्धा वालकर हत्याकांडाशीही केली जात आहे.