Crime News : हॉलिवूडमध्ये चर्चेत असलेल्या क्राइम सीरीज द स्टेयरकेस पाहून एका व्यक्तीने आपल्याच पत्नीची हत्या केली. हत्येनंतर पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. आरोपी नवऱ्याने हत्यार लपवून ठेवलं होतं. फॉरेन्सिक पथकाने तपास करत संपूर्ण कट उघडकीस आला. अखेरीस अनेक राज्यांमध्ये पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी रेल्वे स्थानकावर आरोपीला अटक केली. ही घटना राजधानी दिल्लीतील आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 16 वर्षीय पीडितेवर सामूहिक अत्याचार, दगडाने ठेचून ठार मारून गुप्तांगात रॉड टाकला
दिल्लीच्या शाहदरा परिसरात 30 जुलै रोजी रात्री गगन विहार येथील एका घरात कोमल सिंह (वय 50) महिला रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली होती. घरी आलेल्या मुलाने आईचा मृतदेह पाहून पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तपास सुरू केला असता, महिलेनं आत्महत्या केल्याचा संशय आला. दरम्यान, मुलाने सुरूवातीला वडील कलम सिंह (वय 53) वर हत्येचा संशय असल्याचं सांगितलं.
पोलिसांनी हत्येत वापरलेली तलवार केली जप्त
एकूण तपासातून पोलिसांना समजले की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा दोन्ही मुलं घरातून बाहेर निघाल्यानंतर घरात नवरा-बायकोच होते. संबंधित सीसीटीव्ही फुटेजची तापणसी केली असता, काही वेळानंतर आरोपी हा घरातून बाहेर निघताना दिसत होता. त्याच बॅगेतून पोलिसांनी हत्येत वापरलेली तलवार जप्त केली.
पोलिसांच्या तपासातून समोर आलं की, कलम सिंहने आपल्या बँक खात्यातून तब्बल सात लाख रुपये काढले होते, नंतर दिल्लीहून गोरखपुरकडे पळून गेला. सुरूवातीला त्याने नेपाळला जाण्याचं प्लान केला होता. पोलिसांनी दिशाभूल करण्यासाठी त्याने आपला मार्ग मथुरेकडे वळवला. तांत्रिक पाळत आणि ठिकाणाचा मागोवा घेऊन पोलिसांनी मथुरा रेल्वे स्थानकाजवळ पकडण्यात आले. तेव्हा ताब्यातून 12.75 लाख रोख रक्कम आणि घटनेनंतर वापरण्यात आलेली स्कूटर जप्त करण्यात आलीय.
हॉलिवूड क्राईममुळे नवरा प्रभावित होऊन पत्नीचा खून
पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपीनं कबूल करण्यात आलं की, 'द स्टेअरकेस' या लोकप्रिय हॉलिवूड क्राइम मालिकेमुळे प्रभावित झाला होता, त्याचा आत्मविश्वास होता की शस्त्र लपवून आणि दुसरे शस्त्र घटनास्थळी सोडून दिल्यास, तपासाचे काम भरकटण्याची शक्यता होती. मात्र, वैज्ञानिक पुरावे, सीसीटीव्हीचा तपासामुळे आरोपीच्या योजनेवर पाणी फरून कट उधळला.
हे ही वाचा : खाकी वर्दीला काळिमा! पोलीस कॉन्स्टेबलकडून स्मशानभूमीत 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार
दरम्यान, फॉरेन्सिक पथकाने तपास केल्यानंतर जप्त केलेल्या पुराव्यांची तपासणी केली आणि काही बाबींच्या माध्यमातून प्रकरणाचा तपास सुरू केला होता. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपीवर खून आणि पुरावा नष्ट करण्यासह संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ADVERTISEMENT












