पत्नीचे दुसऱ्याशी प्रेमसंबंध, नवऱ्याला सहन झालं नाही, तरुणावर चाकूने सपासप केले वार अन्... भयंकर कांड

Crime News : अनैतिक प्रेमसंबंधाच्या संशयातून पतीने धारदार शस्त्राने एका तरुणावर वार करत संपवलं. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला, नंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनं लोकांमध्ये तीव्रतेची भावना तयार झाली.

crime news

crime news

मुंबई तक

20 Apr 2026 (अपडेटेड: 20 Apr 2026, 07:47 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अनैतिक प्रेमसंबंधाच्या संशयातून पतीने तरुणाला संपवलं

point

परिसरात एकच खळबळ माजली

Crime News : छत्तीसगमधील दुर्ग येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अनैतिक प्रेमसंबंधाच्या संशयातून पतीने धारदार शस्त्राने एका तरुणावर वार करत हत्या केली. या हल्ल्यात तरुण गंभीरपणे जखमी झाला, नंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनं लोकांमध्ये तीव्रतेची भावना तयार झाली, तसेच हे धक्कादायक प्रकरण चर्चेचा विषय बनले आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पुणे : सिक्युरिटी गार्डचा अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार, मुलगी गरोदर राहिल्यानंतर समोर आलं प्रकरण

पत्नीचा तरुणाशी अनैतिक संबंधाचा संशय 

घडलेल्या घटनेनुसार, आरोपी पतीला आपल्या पत्नीचा एका तरुणाशी अनैतिक संबंधाचा संशय आला होता. संतापलेल्या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली आहे. स्थानिकांनी जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केले. 

आरोपी नवऱ्याच्या आवळल्या मुसक्या 

संबंधित घटनेची माहिती मिळताच, दुर्ग शहर कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी प्रकरणाचा तपास केला. पीडितेच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी तात्काळपणे कारवाई करत आरोपी नवऱ्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्यावर हत्येचा प्रयत्न यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 

हे ही वाचा : मुंबई- पुणे महामार्गावरील' मिसिंग लिंक'चा मुहूर्त ठरला, 'या' वाहनांना असेल परवानगी, टोलसाठी आकारले जाणार 'एवढे' पैसे

पोलिसांच्या माहितीनुसार, या घटनेचा सखोल प्रताप सुरु करण्यात आला असून वापरलेले शस्त्र जप्त देखील करण्यात आले. अशातच जखमी झालेल्या तरुणाची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त समोर आले. त्याच्यावर डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरु आहेत. पोलिसांनी जनतेला आवाहन केलं की, यामुळे हिंसाचाराचा मार्ग अवलंबू नका.