Crime News : राजस्थानातील जैसलमेरमध्ये एका तरुणीने अश्लील कृत्य करणारा व्हिडिओ समोर आला आहे. एका वृद्ध व्यक्तीला ठिकाणाचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याच्यासोबत अश्लील चाळे केले आहेत. या प्रकरणाचा गोप्यस्फोट करण्यात आला आहे. दरम्यान, युवतीने याआधीही अश्लील व्हिडिओ बनवले होते. ते व्हिडिओ पॉर्नसाईटवर शेअर करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : कॅम्पमधला बंगला, तरूणींचं रॅकेट आणि... NCP नेत्याच्या राजीनाम्यामागची इनसाईड स्टोरी
कसा झाला गौप्यस्फोट?
पोलिसांच्या तक्रारीनुसार, व्हिडिओसंबंधित ही पहिलीच घटना नव्हती. याआधीही तरुणीने अनेक अश्लील व्हिडिओ बनवत तरुणी आपला चेहरा ब्लर करते, आवाजही बदलला जातो. त्यानंतर पॉर्नसाईटला व्हिडिओंची विक्री केली जाते. याचं एक मोठं रॅकेट असल्याचं बोललं जात आहे. ज्यात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते.
संबंधित तरुणीचे नाव हे स्मृती जैन आहे. जी उत्तर प्रदेशातील ललितपुर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिच्या वडिलांचं दुकान आहे. तर तिचे कुटुंब हे मध्यमवर्गीय आहे. तिच्या शिक्षणाच्या खर्चासाठी तरुणीच्या कुटुंबाने कर्ज घेतलं होते. तिला दिल्लीत शिक्षणासाठी पाठवलं होते. तिने एका सॉफ्टवेअर इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलं. तिने एका कंपनीत नोकरीही मिळवली होती. मात्र, नंतर तिने चुकीचा मार्ग स्वीकारल्याने होत्याचं नव्हतं झालं.
तरुणींच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे की, शिक्षण सुरू असताना तिला काही मित्र मैत्रिणींची संगत लाभली होती. अधिक पैसे कमावण्याच्या ललचेपोटी ती दलदलीत रुतून बसली. सुरूवातीला ब्लर असणाऱ्या व्हिडिओनंतर आता तिने चेहरा ब्लर करणं सोडून दिलं होतं. आतातिचे अश्लील व्हिडिओ बनवणे हे क्षेत्रच झालं होतं.
न्यायालयात तरुणीच्या पालकांना कोसळलं रडू
दरम्यान, पोलिसांनी तरुण आणि तरुणीला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी तिचे आई -वडील त्या ठिकाणी उपस्थित होते. हे सर्व पाहून न्यायालयातच तिच्या आई वडिलांना ढसा ढसा रडू कोसळलं. ते म्हणाले की, लेकीच्या शिक्षणासाठी आम्ही कर्ज काढलं होतं. तिला नोकरीची संधी मिळाली. पण आता सर्व काही संपलेलं आहे. आता ना नोकरी आणि ना प्रतिष्ठा. समाजात तोंड दाखवायला जागा नाही.
हेही वाचा : Fact Check: साधूने खरंच सगळ्यांसमोर विदेशी महिलेला केलं Kiss? Video चं सत्य आलं समोर!
या प्रकरणामुळे कंपनीने तरुणीला कामावरून काढून टाकण्यात आलं. कुटुंब आर्थिक संकटाचा सामना करत आहे. तसेच समाजाने त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला आहे. तरुणीच्या वडिलांचं म्हणणं आहे की, आम्हाला यावर विश्वास बसत नाही. तिला आपल्या पायावर उभं राहण्यासाठी दिल्लीला पाठवलं होतं. मात्र, घडलं भलतंच, अशी भावना तरुणीच्या पालकांनी व्यक्त केली.
ADVERTISEMENT
