हनिमूनच्या दिवशी पती जवळ आला, तेव्हाच पत्नीला झाली पुतण्याची आठवण अन्...

crime news : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कॅप्टन आणि सिताराने एकमेकांना पसंत करत कसलाही संकोच न ठेवता अरेंज मॅरेज केलं. हनिमूनदिवशी सिताराने आपल्या नवऱ्यासोबत केलेल्या कृत्यामुळे दोघांच्याही नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. 

crime news

crime news

मुंबई तक

23 Jun 2025 (अपडेटेड: 23 Jun 2025, 04:13 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

हनिमून दिवशी पत्नीने नवऱ्याला दिली धमकी

point

पुतण्याशी केलं एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्स

Crime news : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कॅप्टन आणि सिताराने एकमेकांना पसंत करत कसलाही संकोच न ठेवता अरेंज मॅरेज केलं. मात्र, त्यानंतर जे काही घडले ते ऐकून पायाखालची जमीन सरकेल. हनिमूनदिवशी सिताराने आपल्या नवऱ्यासोबत केलेल्या कृत्यामुळे दोघांच्याही नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : भयंकर! कॅन्सरग्रस्त आजीला नातवानेच कचऱ्यात सोडलं, उपचारासाठी पोलिसांनी रुग्णालयांचे 9 तास उंबरे झिजवले

हनिमूनदिवशी कॅप्टन महिलेच्या जवळ येत होता. त्यावेळी सितारा त्याला दूर ढकलायची. 'जर माझ्या जवळ आलास तर मी चाकूने मारेल', अशी ती धमकी देऊ लागली होती. सिताराच्या या कृत्याने कॅप्टनच्या मानात भिती निर्माण झाली. दररोज रात्री सितारा आपल्या उशीखाली चाकू ठेवून झोपू लागली. त्यानंतर तिचा पती कॅप्टन पुन्हा तिच्या जवळ आलाच नाही. 

घटनेचा खुलासा 

कॅप्टन आणि सिताराने दोघांच्या पसंतीने अरेंज मॅरेज केलं. पण हनिमूनदिवशी सितारा ही कॅप्टनशी जवळीकता साधत नव्हती. सितारा असं का वागत आहे? असा कॅप्टनला प्रश्न पडला. यानंतर घटनेची माहिती उलगडू लागली. सिताराचे तिच्याच पुतण्याशी सूत जुळले होते. 10 -12 मुलांच्या मदतीने मारहाण करेन या धमकीपोटी सितारा पतीपासून लांब होती. सिताराने कॅप्टनसोबत लग्न करूनही तिनं तिच्या बॉयफ्रेंडसोबत कोर्ट मॅरेज केलं. 

अखेर पत्नी प्रियकरासोबत छू...

या घटनेची माहिती कुटुंबियांना मिळाली असता, कुटुंबियांनी या प्रकरणातून वाट काढण्याचा प्रयत्न केला. नातं टिकवण्यासाठी लेखी करार करण्यात आला होता. मुलीला तिच्या सासरच्या घरी परत पाठवण्यात आले. पण त्याचा कोणताही फरक पडला नाही. पुन्हा सितारा आपल्या सासरच्या घरी परतली असता, काही दिवस शांततेचे गेले. पण संधी साधून तिने घराच्या छतावरून उडी मारली आणि पळ काढला. तिचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. 

हेही वाचा : मुंबई हादरली! 10 वर्षाच्या मुलीवर आईच्याच बॉयफ्रेंडनं केलं लैंगिक शोषण, गुप्तांगात स्क्रू ड्रायव्हर टाकत व्हिडिओ बनवला

दरम्यान, सिताराने आपल्या प्रियकर पुतण्यासोबत कोर्ट मॅरेज केलं. यामुळे कॅप्टनचे कुटुंब घाबरले आहे. कप्टनची आई आणि बहीण म्हणाल्या की, 'जर कॅप्टनला काही झालं असतं तर कुटुंबाचं मोठं नुकसान झालं असतं'. कुटुंबाला भिती आहे की, 'सितारा पुन्हा कधीही घरी येईल आणि खोटे आरोप करेल'. या घटनेदरम्यान, कॅप्टनचे कुटुंब पोलिसांकडे न्यायाची मागणी करत आहे.   

    follow whatsapp