ट्रक ड्रायव्हर नवऱ्यासोबत त्याचा दोस्त घरी यायचा, बायको प्रेमात पडली,...मोठं कांड केलं, प्रकरण ऐकून पोलीसही चक्रावले

मुंबई तक

16 Feb 2026 (अपडेटेड: 16 Feb 2026, 03:55 PM)

Crime News Marathi : मृत अमित सिंह हे व्यवसायाने ट्रक चालक होते. ते मदनपूर पनियार गावचे रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, अमित यांचा दीपक नावाचा मित्रही ट्रक चालक होता. दोघांमध्ये घट्ट मैत्री असल्याने दीपकचे अमित यांच्या घरी नेहमी येणे-जाणे होते. याच दरम्यान अमित यांची पत्नी शिल्पी सिंह आणि दीपक यांच्यात प्रेमसंबंध जुळल्याचे समोर आले आहे.

Crime News Marathi

Crime News Marathi

Google CTA

बातम्या हायलाइट

point

ट्रक ड्रायव्हर नवऱ्यासोबत त्याचा दोस्त घरी यायचा, बायको प्रेमात पडली,..

point

.मोठं कांड केलं, प्रकरण ऐकून पोलीसही चक्रावले

Crime News Marathi : उत्तर प्रदेश मधील सुल्तानपूर जिल्ह्यात अनैतिक संबंधांतून पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लंभुआ कोतवाली हद्दीतील मदनपूर पनियार गावात एका विवाहित महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या पतीचा जीव घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी असलेल्या प्रियकराच्या शोधासाठी विशेष पथके रवाना झाली आहेत.

हे वाचलं का?

मृत अमित सिंह हे व्यवसायाने ट्रक चालक होते. ते मदनपूर पनियार गावचे रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, अमित यांचा दीपक नावाचा मित्रही ट्रक चालक होता. दोघांमध्ये घट्ट मैत्री असल्याने दीपकचे अमित यांच्या घरी नेहमी येणे-जाणे होते. याच दरम्यान अमित यांची पत्नी शिल्पी सिंह आणि दीपक यांच्यात प्रेमसंबंध जुळल्याचे समोर आले आहे.

कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पी आणि दीपक यांच्या संबंधांची माहिती कुटुंबीयांना मिळाल्यानंतर घरात वाद निर्माण झाला होता. त्यावेळी समज देऊन प्रकरण शांत करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही दोघांमध्ये संपर्क सुरूच होता. या संबंधांना अमित यांचा विरोध असल्याने त्यांना मार्गातून हटवण्याचा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा : जालन्यात विवाहितेचा अमानुष छळ, माहेरहून पैसे आणण्यास टाकला दबाव, पीडितेनं गळफास घेत संपवलं जीवन

दीपक शनिवारी पुन्हा एकदा अमित यांच्या घरी आला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शनिवारी मध्यरात्री अमित गाढ झोपेत असताना आरोपींनी हल्ला केला. धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हल्ला इतका गंभीर होता की अमित यांना बचावाची संधीही मिळाली नाही आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. लंभुआ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे संकलित केले आहेत.

जिल्हा पोलिस अधीक्षक चारू निगम यांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत मुख्य आरोपी दीपकच्या अटकेसाठी चार विशेष पथके स्थापन केली आहेत. आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल, असा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, पत्नी शिल्पी सिंह हिला अटक करून पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

जालन्यात विवाहितेचा अमानुष छळ, माहेरहून पैसे आणण्यास टाकला दबाव, पीडितेनं गळफास घेत संपवलं जीवन