Crime News Marathi : झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यातील महागामा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आलीये. महिलेने तिच्या दीरासोबतचे प्रेम संबंध टिकवण्यासाठी पत्नीचा काटा काढल्याची घटना घडलीये. दीरासोबत संगनमत करून महिलेने सुपारी देऊन पतीचा खून घडवून आणल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून मृताचा भाऊ रोहित मोदी हा सध्या फरार आहे.
ADVERTISEMENT
माहितीनुसार, 27 जानेवारी रोजी मांगन पिपरा गावात 32 वर्षीय व्यक्तीची कुऱ्हाडीने हत्या करण्यात आली होती. अज्ञात व्यक्तींनी डोक्यावर वार केल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. सुरुवातीला हा खून वैयक्तिक वादातून झाला असावा, असा अंदाज होता; मात्र पोलिसांनी तांत्रिक पुरावे, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि स्थानिक चौकशीच्या आधारे तपासाची दिशा बदलली.
उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर आझाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताची पत्नी सोनी देवी (30) हिचे तिच्या दीर रोहित मोदी याच्यासोबत गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांना विवाह करायचा होता. मात्र पती अडथळा ठरत असल्याने त्याला मार्गातून दूर करण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.
हेही वाचा : मुंबईतील मुलुंड मेट्रोचा निर्माणाधीन स्लॅब कोसळला, पोलिसांची धडाकेबाज कारवाई, पाच जणांना पोलीस कस्टडी
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रोहित मोदीने आपल्या ओळखीतील मोहम्मद शाईन याला एक लाख रुपयांत खून करण्याची सुपारी दिली. शाईनने विजेंद्र पासवान उर्फ बिडो याला या कटात सहभागी करून घेतले आणि त्याला 25 हजार रुपये दिले. आरोपींनी गुन्ह्यासाठी आधीच कुऱ्हाड खरेदी केली होती. 27 जानेवारीच्या रात्री रोहितच्या सांगण्यावरून मृत व्यक्तीला दारू पिण्याच्या बहाण्याने घराबाहेर बोलावण्यात आले. एकांत मिळताच त्याच्यावर कुऱ्हाडीने जोरदार वार करण्यात आला. डोक्यावर झालेल्या गंभीर जखमांमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते.
तपासादरम्यान पोलिसांनी पत्नी सोनी देवीसह मोहम्मद शाईन आणि विजेंद्र पासवान यांना अटक केली. चौकशीदरम्यान आरोपींकडून गुन्ह्याची कबुली मिळाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. खुनासाठी वापरलेली कुऱ्हाड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, फरार आरोपी रोहित मोदी याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून छापेमारी सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, कौटुंबिक नात्यांतील विश्वासघाताचा हा प्रकार असल्याची चर्चा सुरू आहे. पोलिस तपास पुढे सुरू असून आणखी तपशील पुढील चौकशीत समोर येण्याची शक्यता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











