उत्तर प्रदेशातील मथुरा येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्या वडिलांची हत्या करण्यात आली. या हत्याकांडात त्यांची पत्नी, मुलगी आणि मुलीचा प्रियकर सहभागी असल्याचा आरोप आहे. गोविंद नगर परिसरातील जयसिंहपुरा येथील मनोज सोनी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या पत्नी, मुलगी आणि विमल चौधरी यांना अटक केली आहे. मुलीच्या प्रेमसंबंधाला वडिलांचा विरोध असल्याने हे हत्याकांड घडल्याचे तपासात समोर आले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : निवडणुकीत दिलेलं कुणबी प्रमाणपत्र रद्द, संजय शिरसाट जरांगेंचा उल्लेख करत काय बोलले?
प्रेमसंबंधाला अडथळा ठरत असल्याने बापाची हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज सोनी हे त्यांच्या मुलीच्या विमल चौधरीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या विरोधात होते. प्रेमसंबंधाला अडथळा ठरत असल्याने मनोज यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी मनोज यांच्या पत्नीला, मुलीला आणि विमल चौधरीला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत तिन्ही आरोपींनी मनोज यांच्या हत्येची कबुली दिल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून मनोज सोनी यांची इलेक्ट्रिक स्कूटीही जप्त केली आहे.
हेही वाचा : नाशकात एकामागून एक भुकंपाचे धक्के, घर सोडून लोकं पळाले, रात्री उशिरा काय घडलं?
मृतदेहाचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत मनोज सोनी यांच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवली. मात्र, पोलिसांकडून बराच शोध घेऊनही मनोज यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. या घटनेनंतर मनोज यांच्या कुटुंबीयांमध्ये मोठा संताप आहे. परिसरातही या हत्याकांडाची चर्चा सुरू आहे. मनोज यांच्या बहिणी भावना वर्मा यांनी तिन्ही आरोपींनी मिळून आपल्या भावाची हत्या केल्याचा आरोप केला असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मनोज यांचे भाऊ रामबाबू वर्मा यांनी सांगितले की, आरोपींनी आधी त्यांच्या भावाला गायब केले आणि त्यानंतर पोलिसांच्या चौकशीत हत्या केल्याची कबुली दिली. या घटनेनंतर कुटुंबीयांनी प्रशासनाकडे सर्व आरोपींविरोधात कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुलीच्या प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्या वडिलांच्या हत्येच्या या प्रकरणामुळे मथुरेत खळबळ उडाली असून, मनोज सोनी यांचा मृतदेह अद्याप न मिळाल्याने प्रकरणातील तपासाला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे.
ADVERTISEMENT












