crime news : आई आणि मुलाच्या नात्याऐवढं पवित्र नातं या जगात कुठेच नसतं. मात्र, याच नात्यात एका तिसऱ्या व्यक्तीमुळे आई आणि मुलाचं नातं तुटलं एका झटक्यात संपवलं आहे. एका अल्पवयीन मुलाने आपल्या आईला तिच्या बॉयफ्रेंडसोबत बेडरूममध्ये पाहिले. हे सर्व चित्र पाहून महिलेच्या बॉयफ्रेंडनं तिच्या दोन्ही मुलांची हत्या केली. तरुणाचे नाव फैजान असे आहे. मंगळवारी पोलिसांनी आरोपी हल्लेखोराच्या मुसक्या आवळल्या आहेlत, दरम्यान, ही घटना उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनगरातील मच्छरहट्टा निवासी सोना शर्माच्या पतीचा दोन वर्षांपूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला होता. ती आपला मुलग सूरजसोबत (वय 10) आणि तिच्या 5 (वय 10) मुलीसोबत राहत होती. पुढे पोलीस म्हणाले की, आईचे फैजानसोबत प्रेमसंबंध होते. तो नेहमी घरी यायचा, तेव्हाच त्याला आणि आईला एका बेडरुममध्ये पाहिलं.
संबंधित प्रकरणात पोलीस उपायुक्त टी. सर्वननने सांगितलं की, तीन दिवसांपूर्वी सूरजने आपल्या आईला आणि फैजानला एकाच रूमध्ये आक्षेपार्ह परिस्थितीत पाहिले होते. तेव्हा महिला आणि तिचा बॉयफ्रेंड फैजान भयभीत झाला. त्यानंतर त्याने कट रचत सूरजला एका निर्जनस्थळी नेले आणि तेव्हा राशिद नावाच्या एका मित्राला बोलावले. त्यानंतर त्या तरुणाचा गळा दाबत हत्या करण्यात आली आणि मृतदेह एका ठिकाणी लपवण्यात आला.
महिलेची चूक आली अंगलट
त्यांनी पोलिसांनी सांगितलं आपल्या गुन्हेगारी कृत्याला लपवण्यासाठी सोना शर्माने म्हणजेच महिलेनं रात्री 1.30 वाजता बेपत्ता झाल्याची रामगनर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आपल्या मुलांचं अपहण करण्यात आल्याचं त्या महिलेनं म्हटलं होतं. संबंधित प्रकरणात पोलिसांनी लक्ष घातलं असता, हे प्रकरण समोर आलं. पोलिसांना आईच्या बोलण्यातून सतत फैजान आणि राशिदचं नाव यायचं. त्यामुळे पोलिसांनी फैजान आणि राशिदला आपल्या ताब्यात घेतलं.
हे ही वाचा : 'तुम रुठी रहो मै मनाता रहो...' गाण्यावर अधिकाऱ्याचं बायकोसोबत नाचकाम, व्हिडिओ केला युट्यूबवर शेअर, आता भोगतोय कर्माची फळं
चौकशीदरम्यान, पोलीस मंगळवारी रात्री अगदी शेवटपर्यंत घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा त्याने पोलिसांच्या हातातून बंदूग घेतली आणि गोळीबार केला. तेव्हा पोलिसांच्या पथकातील एकाने त्याच्याच पायावर गोळीबार केला. त्यानंतर आरोपी फैजान आणि राशिदला पोलिसांनी अटक केली आहे.
ADVERTISEMENT
