Crime News : मध्य प्रदेशातील हरदा येथे काका आणि पुतणीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुतणीचाच काकावर जीव जडला आणि त्या दोघांनीही पळून जाऊन लग्न केलं. त्यांतर ते दोघेही नोकरीसाठी पुन्हा हरदा येथे परतले असता, संबंधित प्रकरणाची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना समजली. त्यानंतर, कुटुंबीयांनी त्यांना पोलीस ठाण्यात नेले आणि ती तरुणी आपल्या काकांसोबत राहायचंय असा हट्ट धरू लागली. तिचं म्हणणं आहे की, ते माझे काका नसून माझे पतीच आहेत. मला त्यांच्यासोबतच राहायचं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : हुंड्यांची मागणी अन् अनैतिक संबंध, पत्नीचा मृतदेह फासावर लटकलेला आढळला, तरुणीच्या वडिलांनी सगळंच सांगितलं
नेमकं काय घडलं?
पोलीस संबंधित प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलीस ठाण्यात नेण्यापूर्वी काका आणि पुतणी रस्त्यावर दिसत आहेत. त्यांचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सांगण्यात येत आहे की, दीड महिन्यांपूर्वी मुलगी आपल्याच काकांसोबत पळून गेली होती आणि त्यांनी लव्ह मॅरेज केलं होतं. दरम्यान, मुलीने लग्न केलेला पुरुष सख्खा काका नाही. लग्नाच्या 20 दिवसानंतर दोघेही हरदा येथे पुन्हा परतले होते. काही दिवसांपूर्वी कुटुंबीयांना या दोघांबाबत माहिती समजली.
तरुणी तिच्या मतांवर ठाम
कुटुंबीयांनी तरुणीला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला. पण, ती तरुणी तिच्या मतांवर ठाम होती. या तरुणीला दोन भाऊ आहेत. त्यांनीही अनेकदा तिला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तरुणी ऐकायचं नावच घेत नव्हती. तेव्हा कुटुंबीयाने तरुणीला जबरदस्ती जबरदस्ती कारमध्ये बसवले आणि पोलीस ठाण्यात नेले.
हे ही वाचा : 'तुला जर माझ्याशी लग्न करायचं तर...' पतीचं बाहेर लफडं अन् पत्नीवर चाकूने 7 वेळा केले सपासप वार
पोलीस ठाण्यात नेल्यावर तरूणी बोलू लागली की, माझी काकासोबत लग्न केलं असल्याने मला इथं जबरदस्ती आणण्यात आलं. मी माझ्या पतीसोबत राहणार आहे. पोलिसांनी संबंधित प्रकरणात सीसीटीव्ही पाहिले आणि त्यानंतर पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला. एसपीने सांगितलं की, कुटुंबीयच तरुणीला घरी घेऊन जाण्यासाठी आले होते. ASI दिनेश शेखावत यांनी सांगितलं की, त्यांना संबंधित घटनेची माहिती ही स्थानिकांकडून मिळाली होती.
ADVERTISEMENT
