बिकानेर: राजस्थानच्या बिकानेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका परदेशी महिलेला प्रथम हॉटेलमध्ये बोलावण्यात आले, नंतर तिच्याशी असे काही केले गेले ज्यामुळे सगळेच हादरून गेले. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण काय आहे.
ADVERTISEMENT
खरं तर, परदेशी महिला वर्किंग व्हिसावर भारतात राहत आहे. ती बिकानेरच्या शहरी भागात भाड्याने घेतलेल्या अपार्टमेंटमध्ये राहते. महिलेने सांगितले की, 2 ऑगस्ट रोजी इव्हेंट मॅनेजर तिला जेवणाच्या बहाण्याने हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथेच बलात्काराची घटना घडली.
ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी त्या तरुणाला राउंडअप केलं. तसंच पोलीस हॉटेल आणि इतर ठिकाणी कसून चौकशी करत आहेत. त्याचबरोबर पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे. तसेच, परदेशी महिलेचीही चौकशी केली जात आहे.
हे ही वाचा>> पुतणीचाच जडला काकावर जीव, नंतर दोघांनीही केलं पळून जाऊन लग्न, नंतर कुटुंबीयांनी भररस्त्यातच...
परदेशी महिलांसोबत असे कृत्य घडण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही परदेशी महिलांवर बलात्काराच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत.
एक महिन्यापूर्वी उदयपूरमध्ये एका फ्रेंच मुलीवर झालेला बलात्कार
एक महिन्यापूर्वी उदयपूरमध्ये जाहिरातीच्या शूटिंगसाठी आलेल्या एका फ्रेंच पर्यटकावर बलात्काराचा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेपूर्वी आरोपीने मुलीसोबत एका कॅफेमध्ये पार्टीही केली होती. त्यानंतर त्याने तिला आमिष दाखवून बडगाव परिसरातील त्याच्या घरी नेले. येथे त्याने तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केले होते.
हे ही वाचा>> हुंड्यांची मागणी अन् अनैतिक संबंध, पत्नीचा मृतदेह फासावर लटकलेला आढळला, तरुणीच्या वडिलांनी सगळंच सांगितलं
चुरूमध्ये 13 वर्षीय परदेशी मुलीवर बलात्कार
सुमारे 8 महिन्यांपूर्वी चुरुमध्येही एका परदेशी मुलीवर बलात्काराचा प्रकार उघडकीस आला होता. 13 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या पोटात वेदना होत असताना तिच्या कुटुंबातील सदस्यांनी तिला डीबी रुग्णालयात नेले. तेथे चाचणी केल्यानंतर अल्पवयीन सुमारे 5 महिन्यांची गर्भवती असल्याचे आढळून आले. अल्पवयीन तिच्या कुटुंबासह भाड्याच्या घरात राहत होती.
फेसबुकवर मैत्री केली, तिला राजस्थानला बोलावले आणि तिच्यावर बलात्कार
सुमारे एक वर्षापूर्वी, एका विवाहित वकिलाने फेसबुकवर अमेरिकेतील 45 वर्षीय घटस्फोटित महिलेशी मैत्री केली. त्याने अविवाहित असल्याचे भासवून तिला भारतात बोलावले. त्याने तिला जयपूर आणि अजमेरसह अनेक ठिकाणी हॉटेलमध्ये राहायला लावले. या काळात तो परदेशी महिलेवर बलात्कार करत राहिला.
ADVERTISEMENT
