अल्पवयीन तरुणीला जाळ्यात ओढलं, नंतर बलात्कार अन् अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल! शेवटी, पीडितेच्या कुटुंबियांनी...

आरोपीने तरुणीला फसवून तिचे अश्लील व्हिडीओ बनवले आणि ते व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने तिच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला.

बलात्कार अन् अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल...

बलात्कार अन् अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल...

मुंबई तक

• 12:30 PM • 12 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

अल्पवयीन तरुणीला जाळ्यात ओढलं अन्...

point

नंतर बलात्कार अन् अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल!

Crime News: राजस्थानमधील चुरू जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन पीडितेवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केल्याचं वृत्त आहे. आरोपीने तरुणीला फसवून तिचे अश्लील व्हिडीओ बनवले आणि ते व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने तिच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

फूस लावून पीडितेला जाळ्यात ओढलं अन्...  

प्रकरणातील पीडिता ही 12 वी इयत्तेत शिकत असून आरोपी इरफान ती शाळेत जात असताना आणि तिथून घरी परतत असताना तिला त्रास द्यायचा. पीडितेच्या कुटुंबियांना सुद्धा याबद्दल कळलं होतं आणि म्हणूनच मुलीची अस्वस्थता पाहून त्यांनी तिची शाळा देखील बदलली, परंतु इरफानने त्याचं घृणास्पद कृत्य करणं थांबवलं नाही. अखेर, आरोपीने गोड बोलून आणि फूस लावून पीडित विद्यार्थ्याला आपल्या जाळ्यात ओढलं आणि दररोज तिच्याशी संपर्क ठेवू लागला. संदीप नावाच्या एका दुसऱ्या एका तरुणाने इरफानला या प्रकरणात मदत केली. तो पीडितेबाबत दररोज आरोपीला अपडेट्स देत असायचा.

बलात्कार अन् अश्लील फोटो दाखवून ब्लॅकमेल  

एके दिवशी, इरफान त्या पीडित तरुणीला एका घरात घेऊन गेला. तिथे त्याने बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला आणि दरम्यान तिचे अश्लील फोटो तसेच व्हिडिओ काढले. त्यानंतर तो तिला त्या फोटो आणि व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल करू लागला. इतकेच नव्हे तर, त्याने त्या बदल्यात पीडितेकडून पैसे देखील मागितले होते. त्याच्या भितीमुळे पीडिता बराच काळ गप्प राहिली आणि तिच्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल तिने कोणालाच काहीही सांगितलं नाही. पण, कुटुंबियांना तिच्या वागण्यावरून संशय आला. 

हे ही वाचा: दिराचा वहिनीसोबत झाला वाद! पण, पुतण्या अन् पुतणीवर राग निघाला अन्... रागाच्या भरात दिराचं भयंकर कृत्य

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल  

अखेर, कुटुंबियांनी पीडितेची विचारपूस केल्यानंतर तिने तिच्यासोबत घडलेल्या भयानक प्रकाराबद्दल सांगितलं. त्यानंतर, मुलीच्या वडिलांनी आरोपीच्या कुटुंबियांना देखील तरुणाच्या घृणास्पद कृत्याबाबत सांगितलं आणि त्याला समज देण्यास देखील सांगितलं. पण, तरीही इरफानने त्याचं ते कृत्य सुरूच ठेवलं. शेवटी, 19 नोव्हेंबर रोजी इरफानविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. 

हे ही वाचा: बलात्कार झाल्यानंतर मुलीने भितीपोटी शिक्षण थांबवलं, बीडमधील धक्कादायक प्रकार; नेमकं काय घडलं?

आरोपी तरुणाला पोलिसांकडून अटक  

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी तरुण पीडित विद्यार्थिनीला सतत त्रास देत होता आणि तिला तिच्या अश्लील फोटो तसेच व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल करून तिच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी यासंबंधी पुरावे गोळा केले आणि आरोपीला अटक करण्यात आली. अटकेनंतर पोलिसांनी आरोपी इरफानला गुरुवारी चुरू येथील पोक्सो न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणामुळे अल्पवयीन मुलींची सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

    follow whatsapp