Crime News : कानपूरमधील बिधानू पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जगदीशपूर गावात 21 वर्षीय मानसीच्या रहस्यमय आणि वेदनादायी मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. मानसी विवाहित होती, मात्र गेल्या सहा महिन्यांपासून ती तिच्या प्रियकर मनीष यादवसोबत राहत होती. तिच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी मनीषवर गंभीर आरोप केले असून, त्यांनी सांगितले की मनीषने प्रथम मानसीवर जबरदस्ती बलात्कार केला आणि नंतर तिच्या गुप्तांगात कापडाचे तुकडे कोंबले. या अमानुष अत्याचारामुळे हतबल होऊन मानसीने सल्फासचे सेवन केले, अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली. तिचे वडील धर्मवीर यांनी मनीष यादवविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी विशेष पथके तयार केली आहेत.
ADVERTISEMENT
माहेरी सुरु असलेल्या कार्यक्रमातून प्रियकरासोबत फरार
मिळालेल्या माहितीनुसार, मझावन येथे राहणाऱ्या मजूर धर्मवीर यांची मुलगी म्हणजेच मानसीचं लग्न तीन वर्षांपूर्वी कानपूर देहातमधील एका गावात झाले होते. सुमारे नऊ महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर तिची ओळख जगदीशपूर येथील मनीष यादवशी झाली. हळूहळू दोघांमध्ये मैत्री वाढली आणि प्रेमसंबंध निर्माण झाले. सहा महिन्यांपूर्वी मानसी माहेरी एका कार्यक्रमासाठी आली असताना ती संधी साधून घरच्यांना न सांगता मनीषसोबत पळून गेली. धर्मवीर यांनी तात्काळ बिधानू पोलिस ठाण्यात मुलीची हरविल्याची नोंद केली. जवळपास दहा दिवसांनी मानसी स्वतः पोलिस ठाण्यात आली आणि तिने आपल्या इच्छेनुसार मनीषसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यानंतर तिचा घरच्यांशी संपर्क जवळपास तुटला होता.
मंगळवारी उशिरा कुटुंबीयांना एका पोलिसाकडून फोन आला की मानसीची तब्येत गंभीर असून तिला हॅलट रुग्णालयात दाखल केले आहे. आई नीलम, वडील धर्मवीर आणि नातेवाईक तातडीने कानपुरात पोहोचले. मात्र रुग्णालयात मानसी जिवंत सापडली नाही. तिथे तिचा मृतदेह मिळाल्यानंतर आई-वडील कोसळले.
हेही वाचा : दिराचा वहिनीसोबत झाला वाद! पण, पुतण्या अन् पुतणीवर राग निघाला अन्... रागाच्या भरात दिराचं भयंकर कृत्य
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने मानसीवर बलात्कार करून तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये कापड कोंबले. हा अपमान आणि वेदना सहन न झाल्यानेच तिने विष प्राशन केले, असे घरच्यांचे मत आहे.मानसीची मावशी सुनीता देवी यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी मानसीने त्यांच्या मुलगी आकांक्षाशी फोनवर बोलताना रडत मनीष तिच्यावर अत्याचार करतो, मारतो आणि बाहेर जाऊ देत नाही, असे सांगितले होते. बोलत असतानाच मनीषने फोन हिसकावून कट केला. त्यानंतर मानसीशी संपर्क होऊ शकला नव्हता.
बुधवारी धर्मवीर एसीपी कार्यालयात गेले आणि आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. एसीपी कृष्णकांत यादव यांनी कुटुंबीयांना कठोर कारवाईचे आश्वासन दिले.
आत्महत्येची प्राथमिक शक्यता, तरीही गंभीर तपास सुरू
एसीपी कृष्णकांत यादव यांच्या माहितीनुसार, धर्मवीर यांच्या तक्रारीवरून मनीष यादवविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पंचनाम्यात शरीरावर विशेष जखमा आढळल्या नसल्या तरी कुटुंबीयांच्या गंभीर आरोपांमुळे तीन डॉक्टरांच्या पॅनेलद्वारे पोस्टमार्टम करण्यात आले. गुप्तांगात कापडाचे तुकडे असल्याची माहिती तपासात समोर आली असून विसरा सुरक्षित ठेवला आहे. मनीषच्या शोधासाठी पाच पथके तयार करण्यात आली आहेत. त्याचा मोबाईल लोकेशन ट्रेस करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
घटनेनंतर आरोपीचा फोन स्विच ऑफ; परिसरात भीतीचे वातावरण
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, घटनेनंतर मनीषने फोन बंद केला असून तो कुठेही दिसलेला नाही. स्थानिकांनी सांगितले की मनीषवर आधीही काही गुन्हे नोंदले गेले आहेत आणि तो परिसरात दबंग म्हणून ओळखला जातो. मझावन आणि जगदीशपूर या दोन्ही गावांमध्ये शोककळा पसरली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











