Crime News : लखनऊमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका मर्चंट नेव्ही ऑफिसरच्या पत्नीने आत्महत्या करत टोकाची भूमिका घेतली असं बोलले जात आहे. पण, तिचा मृतदेह हा गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकताना आढळला होता. पत्नीच्या मृत्यूआधीच नवरा आणि बायकोमध्ये वाद झाला होता. त्यानंतर पीडितेनं आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. परंतु मृत महिलेच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, त्यांच्या मुलीची हत्या करण्यात आली होती आणि नंतर तिने फाशी घेतल्याचं भासवले गेले. सध्या पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि तपास सुरु ठेवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बुलढाण्यात खळबळ! प्रेमप्रकरणातून आरोपीने निष्पाप तरुणावर बुलढाण्यात दिवसाढवळ्या चाकूने केले सपासप वार, काय घडलं?
नेमकं काय घडलं?
रविवारी रात्री 8 वाजता लखनऊच्या सुशांत गोल्फ सिटीमधील ओमॅक्स वॉटर एस्केप सोसायटीत 26 वर्षीय मधु सिंगचा मृत्यू झाला. मधु ही मर्चंट नेव्हीमधील सेकंड ऑफिसर अनुराग सिंग यांची पत्नी होती. दोघांचे लग्न फेब्रुवारी 2025 मध्ये झाले होते. कुटुंबातील सदस्यांचा आरोप आहे की मधुची हत्या करून तिला फाशी देत बनाव रचला होता.
मधुचे वडील फतेह सिंह म्हणाले की, मृत मधुचे वडील बहादूर सिंह यांनी दावा केला की, रविवारी रात्री 8 वाजता त्यांच्या मधुने तिची मोठी बहीण प्रियाला फोन करून सांगितले की, अनुरागने तिला बेदम मारहाण केली आहे. त्यानंतर सकाळपासून तिच्याशी कसलाही संपर्क होऊ दिला नाही. त्यानंतर सोमवारी दुपारी संबंधित घटनेची माहिती आम्हाला मिळाली. घटनेनंतर सोमवारी दुपारी आम्हाला माहिती देण्यात आली. रात्री तिची हत्या करण्यात आली. हत्येचा संशय कोणालाही होऊ नये म्हणून त्याने तरुणीला बनावट घळफाश लावला होता.
हुंड्यासाठी छळ आणि घरगुती हिंसाचाराचे गंभीर आरोप
दरम्यान, या संबंधित प्रकरणात हुंड्यासाठी छळ आणि घरगुती हिंसाचाराचे गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. ते म्हणतात की, लग्नापासून अनुराग सतत हुंड्याची मागणी करायचा. त्यानंतर मारहाणही केली. तसेच धमक्या देणं सुरूच राहिलं होतं. होळीनंतर मधु तिच्या सासरी परतली. कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, मधु ही गर्भवती होती पण अनुरागने तिला जबरदस्ती केली नाही, तसेच तिचे अबॉर्शन केलं. एवढंच नाही,तर त्याचे विवाहबाह्य संबंध होते, यामुळे मधुचा मानसिक तणाव वाढला गेला होता.
हे ही वाचा : 'तुला आणि तुझ्या 4 महिन्यांच्या बाळाचा...', स्वस्तात मोबाईल देतो असं दुकानदाराने सांगितलं अन् कपड्यांच्या दुकानातच लुटली अब्रु
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराग सिंह केवळ 10 दिवसच सुट्टीसाठी घरी आला होता. ज्या दिवशी मधुने आत्महत्या केली, त्याच दिवशी दोघांमध्ये वाद झाला होता. पोलिसांनी मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवला आणि या प्रकरणाचा तपास सुरुच ठेवला आहे. मधुच्या वडिलांच्या जबाबावरून पोलिसांनी एफआरआय दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
