Crime News : मध्य प्रदेशातील छिंदवाड जिल्ह्यातून लज्जास्पद प्रकार उघडकीस आलेला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे गैरकृत्य समोर आणले आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी तब्बल 100 किमीचे अंतर गाठावे लागत आहे. तर दुसरीकडे शिक्षक विद्यार्थी शाळेतून गेल्यानंतर सात वाजेपर्यंत बंद खोलीत असतात, असा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : गर्लफ्रेंडनं प्रियकराचं रॉडने डोकं फोडलं, नंतर डिझेल ओतून पेटवलं
शाळेची वेळ संपल्यानंतर एकाच बंदिस्त वर्गात
विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी मुख्याध्यापक आणि महिला अतिथी शिक्षिकेवर गंभीर आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली. विद्यार्थ्यांचा आरोप असाय की, शाळेतील उपक्रम हा पूर्णपणे थांबवण्यात आले. शिक्षणाऐवजी, दोन्ही शिक्षक दिवसभर मोबाईलवर असतात. शाळेची वेळ संपल्यानंतर एकाच बंदिस्त वर्गात राहतात. या काळात विद्यार्थ्याला किंवा इतर व्यक्तींना आतमध्ये प्रवेश दिला जात नाही.
संबंधित प्रकरणात ग्रामस्थांनी आरोप केला की, या गंभीर परिस्थितीत शिक्षकांच्या अनैतिक वर्तनाबाबत यापूर्वी गट शिक्षक अधिकारी आणि आदिवासी व्यवहार विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती, परंतु अधिकाऱ्यांच्या असंवेदनशीलतेमुळे कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. अधिकाऱ्यांच्या या कृत्याला आणि वृत्तीला कंटाळून ग्रामस्थांनी 16 ऑगस्ट रोजी ग्रामसभेत दोन्ही शिक्षकांना त्यांच्या पदावरून तात्काळ हटवण्याची मागणी करणारा ठराव मंजूर केला होता.
हे ही वाचा : मुलगा होईल असं दाखवलं आमिष, महिलेनं 47.88 लाख रुपयांना घातला गंडा
दरम्यान, 100 किमी अंतरावरून आलेल्या निष्पाप मुलांचे म्हणणे ऐकून ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयाने उत्साहाचे वातावरण आहे. अदिवासी विकास विभागाच्या सहायक आयुक्तांनी प्रकरणाचे गांभीर्य समजून घेऊन चौकशीचे आदेश दिले आणि जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली असे सांगितले.
ADVERTISEMENT












