पुणे : घरात एकट्या असलेल्या मुलीवर शेतात नेऊन अत्याचार अन् मर्डर, 'त्या' चुकीने आरोपी सापडला

मुंबई तक

19 Aug 2026 (अपडेटेड: 19 Aug 2026, 12:18 PM)

Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडीत 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्तीबाबत आरोपीने केलेली एक चूक पोलिसांच्या तपासात महत्त्वाचा धागा ठरली.

Pune Crime News

Pune Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पुणे : घरात एकटीच होती,

point

चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शेतात अत्याचार करुन मर्डर

point

'त्या' चुकीने आरोपी सापडला

Pune Crime News, रायचंद शिंदे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात चौथीत शिकणाऱ्या अवघ्या 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 21 वर्षीय साहिल संपत खैरे याने मुलीला घरातून नेऊन शेजारच्या शेतात तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आणि त्यानंतर तिची हत्या करून मृतदेह शेतात टाकल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पिंपळवंडी परिसरात संताप आणि खळबळ उडाली आहे. मंगळवारी, 18 ऑगस्ट रोजी मुलगी आजारी असल्याने शाळेत गेली नव्हती. तिचे आई-वडील मजुरीसाठी बाहेर गेले असताना ती घरी एकटी होती. याचदरम्यान ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : ठाकरेंच्या केसमध्ये मोठा ट्वीस्ट? सुप्रीम कोर्ट स्वतःचाच निकाल बदलणार?

'ती' चूक आणि आरोपी सापडला 

सायंकाळी मुलगी बेपत्ता असल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी तिचा शोध सुरू केला. या शोधमोहीमेत आरोपी साहिल संपत खैरे हा देखील पोलिसांसोबत सहभागी झाला होता. दरम्यान, तपास सुरू असताना पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले. या फुटेजमध्ये सायकलवरून जाणाऱ्या एका व्यक्तीचे दृश्य दिसत होते. आरोपीनेच हे दृश्य पोलिसांना दाखवत “हा मीच आहे”, असे सांगितल्याची माहिती आहे. आरोपीची हीच चूक पोलिसांच्या तपासातील महत्त्वाचा धागा ठरली. या माहितीमुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय अधिक बळावला आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

हेही वाचा : ग्राऊंड रिपोर्ट : 'भैय्या लोकं हट्टी आहेत, त्यांनी मराठी बोलावं नाहीतर निघून जावं'

अटकेनंतर पोलिसांनी तपास पुढे नेत असताना आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या या घटनेने परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी रात्री बारा वाजता घटनास्थळी भेट दिली. त्यांनी संपूर्ण प्रकरणाची पाहणी केली आणि सुरू असलेल्या तपासाचा आढावा घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पुणे ग्रामीण पोलीस करत आहेत. घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी आणि इतर बाबी तपासातून समोर येणार आहेत. दरम्यान, अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सुनेत्रा पवारांकडून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश

या प्रकरणावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भाष्य केलंय. त्या म्हणाल्या, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी इथं साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी आहे. या घटनेनं मनाला अतिशय वेदना झाल्या. या प्रकरणी पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून तपासाचा आढावा घेतला असून, प्रकरणाची पारदर्शक आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपास वेगानं सुरू आहे. हे कृत्य अत्यंत निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारं आहे. आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळावी, यासाठी या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची विशेष विनंती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीसजी यांच्याकडे करणार आहे. पीडित कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी असून, शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. लवकरच पिंपळवंडी इथं जाऊन पीडित कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेणार आहे. चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी शासनाकडून कोणतीही कसर ठेवली जाणार नाही.