वाशीम : प्रेमी युगुलाचे प्रेमसंबंध, 4 दिवस बेपत्ता, अन् भयंकर घटना उघडकीस

मुंबई तक

19 Aug 2026 (अपडेटेड: 19 Aug 2026, 01:06 PM)

washim crime news : वाशिमच्या मोर्णा तलावात प्रेमी युगुलाचा मृतदेह आढळून आलाय. दोघेही 14 ऑगस्टपासून बेपत्ता होते. कुटुंबियांचा प्रेम संबंधांना विरोध होता, अशी चर्चा आहे.

washim crime news

washim crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

वाशीम : प्रेमी युगुलाचे प्रेमसंबंध

point

4 दिवस बेपत्ता, अन् भयंकर घटना उघडकीस

washim crime news, जका खान : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात मोर्णा तलावात युवक आणि युवतीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दोघेही 14 ऑगस्टपासून बेपत्ता होते. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास मासेमारीसाठी गेलेल्या काही नागरिकांना तलावात दोन मृतदेह तरंगताना दिसले. यानंतर मालेगाव पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.

हे वाचलं का?

हेही वाचा : मुंबई : पत्नी आणि मुलांच्या मृतदेहासोबत घालवले 24 तास! नेव्ही ऑफिसरने आत्महत्येआधी काय केलं?

माहिती मिळताच मालेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तलावातून दोन्ही मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही मृत घोषित केले. मृतांची ओळख 26 वर्षीय महादेव निंबाळकर आणि 16 वर्षीय निकिता कांबळे अशी झाली आहे. दोघेही मालेगाव तालुक्यातील गोकसांगवी गावातील रहिवासी होते.

हेही वाचा : मनोज जरांगेंचा तगडा डाव, समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईत एल्गार? तारीख ठरली

दोघेही 14 ऑगस्टपासून होते बेपत्ता 

महादेव निंबाळकर आणि निकिता कांबळे हे दोघे 14 ऑगस्टपासून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. दरम्यान, तालाबात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना दोघांचे मृतदेह आढळून आल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून याप्रकरणी मर्ग दाखल करण्यात आला आहे.

कुटुंबियांचा लग्नाला विरोध असल्याची माहिती

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महादेव आणि निकिता यांच्यात प्रेमसंबंध होते आणि त्यांच्या संबंधाची माहिती कुटुंबीयांना होती. दोघांनाही लग्न करायचे होते. मात्र, जातिभेदामुळे कुटुंबीय या लग्नासाठी राजी नव्हते, अशी माहिती समोर आली आहे. दोघांचे मृतदेह मोर्णा तलावात आढळून आल्यानंतर मालेगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.