मुलगा होईल असं दाखवलं आमिष, महिलेनं 47.88 लाख रुपयांना घातला गंडा

मुंबई तक

19 Aug 2026 (अपडेटेड: 19 Aug 2026, 03:53 PM)

Dharashiv Crime : धाराशिव येथील एका व्यक्तीने मुलगा होईल असे आश्वासन देत व्यक्तीकडून तब्बल 47.88 लाख रुपये उकळले आहेत. नंतर लैंगिक अत्याचाराच्या खोट्या गुन्ह्याची धमकी देखील दिली होती. संबंधित प्रकरणात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dharashiv crime

Dharashiv crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुलगा होईल असे आमिष दाखवले

point

पीडित व्यक्तीकडून उकळले 47.88 लाख रुपये

Dharashiv Crime : गणेश जाधव - धाराशिव येथील एका व्यक्तीने मुलगा होईल असे आश्वासन देत व्यक्तीकडून तब्बल 47.88 लाख रुपये उकळले आहेत. नंतर लैंगिक अत्याचाराच्या खोट्या गुन्ह्याची धमकी देखील दिली होती. संबंधित प्रकरणात आठ जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील फिर्यादीची धनंजय दगडू मदने अशी ओळख समोर आली आहे. या घटनेनं जिल्हा हादरून गेला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : खारघरच्या पांडवकडा धबधब्यात 16 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

आरोपीने घातला 47.88 लाख रुपयांचा गंडा

या प्रकरणाची धाराशिव जिल्ह्यातील सांजा चौकातील हनुमान मंदिर परिसरातील आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, मदने यांना संबंधित आरोपीने मुलगा होईल असं सांगत त्यांच्याकडून तब्बल 47.88 लाख रुपयांना गंडा घातला होता. 

आठ जणांविरुद्ध गुन्हा 

अशातच आरोपींनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अशातच पुढील प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केलेल्यांची अश्विनी श्रीराम पाटील, पार्वती उत्तम देवकते, भुजंग उत्तम देवकते, रेश्मा भुजंग देवकते (सर्व रा. कार्ला, ता. तुळजापूर), श्रीदेवी दत्ता नन्नवरे व दत्ता नन्नवरे (रा. येळमवाडी, ता. मोहोळ), जयश्री धुळबा शिरगिरे (रा. तेर) आणि दत्ता गंडेदे (रा. पुणे) अशी ओळख समोर आली आहे.

हे ही वाचा : Astrology : चंद्र ग्रहण अत्यंत संवेदनशील राहणार 'या' राशींची परीक्षा घेणार

फिर्यादीला मुलगी असून मुलगा नसल्याची माहिती मदने यांनी आरोपीला दिली होती. आरोपीने मुलगा होईल असे आमिष दाखवले आणि नंतर मोठी रक्कम घेतल्याचा आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देखील दिली होती. या प्रकरणाचा पुढील तपास आनंदनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रविंद्र खांडेकर करत आहेत.