आठवीच्या विद्यार्थ्यावर बाथरूममध्ये लैंगिक अत्याचार, दोन वर्गमित्र आणि 10 वीच्या मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

crime news : पीडिताच्या दोन वर्गमित्रांनी आणि इयत्ता 10 वीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने पीडित मुलावर लैंगिक अत्याचार केले. पीडित विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिन्ही अल्पवयीन विद्यार्थ्यांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. 12 वर्षांची पीडित विद्यार्थी इयत्ता आठवीचे शिक्षण घेत होता. 

Mumbai Tak

मुंबई तक

• 06:03 PM • 26 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

शाळेच्या बाथरुममध्ये नेत मुलावर लैंगिक अत्याचार 

point

2 वर्षांची पीडित विद्यार्थी इयत्ता आठवीत शिकत होता

Crime News : हरियाणातील सारन गावातील शाळेत इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. पीडिताच्या दोन वर्गमित्रांनी आणि इयत्ता 10 वीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने पीडित मुलावर लैंगिक अत्याचार केले. पीडित विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिन्ही अल्पवयीन विद्यार्थ्यांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. 12 वर्षांची पीडित विद्यार्थी इयत्ता आठवीचे शिक्षण घेत होता. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : देवेंद्र फडणवीसांचा फोटो मॉर्फ करुन आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप, शरद पवार गटाच्या सोशल मीडिया प्रमुखाला अटक

शाळेच्या बाथरुममध्ये नेत मुलावर लैंगिक अत्याचार 

घडलेल्या घटनेनुसार, पीडित  शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी घरी जात होता, त्याचक्षणी त्यांच्याच वर्गातील दोन विद्यार्थी आणि एक इयत्ता दहावीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने त्याला शाळेच्या बाथरूमकडे नेले, नंतर त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेनं परिसर हादरून गेला. अनेक दिवसांपासून पीडित विद्यार्थ्यांवर छळ सुरु होता. 

दरम्यान, पीडित मुलगा उदास असल्याचे पाहून वडिलांनी त्याच्याशी प्रेमाने बोलून विचारले की तो अगदी का उदास आहे. विद्यार्थ्याने वडिलांना सर्व काही सांगितले. त्यांनी तात्काळपणे सारण पोलीस ठाण्यात नेले, जिथे त्यांनी पोलिसांना घडलेली घटना सांगत तक्रार दाखल केली. 

हे ही वाचा : शौचाला बसलेल्या नणंद-भावजयीवर सहा नराधमांकडून सामूहिक अत्याचार, क्रूरतेची ओलांडली परिसिमा

दरम्यान, पीडित विद्यार्थी त्याच्या कुटुंबासोबत राहतो. आरोपी असलेले दोन्ही विद्यार्थीही त्याच गावातील रहिवासी आहेत. सारण पोलीस ठाणे प्रभारी ब्रह्मा प्रकाश यांनी सांगितले की, तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करत प्रक्रिया सुरु केली. या प्रकरणाचा पुढील तपास केला जात असून कारवाईची प्रक्रिया केली जात आहे.