मतिमंद अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीच्या आवळल्या मुसक्या

मुंबई तक

08 Jun 2026 (अपडेटेड: 09 Jun 2026, 01:13 AM)

Crime News : अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली. अटक करताना पोलिसांनी आरोपीवर गोळीबार केला, त्या गोळीबारात आरोपी जखमी झाला. पीडित मुलगी ही मतिमंद असल्याचे सांगण्यात येते.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

point

आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल

Crime News : उत्तर प्रदेशातील रामपूरच्या सैफनी पोलीस ठाणे हद्दीतील खरसाल गावात अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली. अटक करताना पोलिसांनी आरोपीवर गोळीबार केला, त्या गोळीबारात आरोपी जखमी झाला. या प्रकरणातील आरोपीची ओळख साबिर अशी झाली. साबिरने मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केला, या प्रकरणी पीडितेच्या आईने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पोलिसांनी पुढील तपास सुरू ठेवला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बीड: गुंगीचे औषध देत तरुणीला लॉजवर नेलं, नंतर ब्लॅकमेल करत 'तसले' फोटो व्हिडिओ...

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पीडितेचा भाऊ, अंकितने घटनेचा सर्व प्रकार सांगितला, त्यांचे वडील कामावर होते आणि आई कपडे शिवण्यासाठी गेली होती. याचदरम्यान आरोपी साबिरने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. आरोपी हा त्याच गावातील असून, त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी गंगा पुलाजवळ घेराव घालत बंदी केली, जेव्हा आरोपीने पोलिसांनी गोळीबार केला, तेव्हा प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार केला. ज्यात त्याच्या पायाला गोळी लागली, त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. 

आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल

अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनुराग सिंह यांनी सांगितलं की, आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर आरोपीने पोलिसांवर हल्ला केला, परंतु परिस्थितीत नियंत्रणात आणण्यात आली. आरोपीला तात्काळपणे जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. पीडित व्यक्तीची मानसिकता ही अस्थिर असून वैद्यकीय तपासणीनंतर प्रकरणाची पुष्टी केली जाईल. 

हे ही वाचा : बॉयफ्रेंडनं 17 वर्षीय मुलीवर 60 वेळा कुऱ्हाडीने केला हल्ला, नंतर छतावरून फेकलं, पुढं...

या घटनेनं सामाजातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा प्रकारामुळे धक्कादायक घटना घडताना दिसतात. पोलिसांनी सतर्क राहून हे गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी कटिबद्ध राहणे गरजेचे आहे.