Crime News : हरियाणातील पानीपत आणि सोनीपत या दोन जिल्ह्यांत झालेल्या चार चिमुकल्यांच्या सलग हत्यांनी संपूर्ण राज्य हादरून गेलं आहे. वर्षानुवर्षे ‘अपघात’ म्हणून समजल्या गेलेल्या या मृत्युंच्या मागे एक थरकाप उडवणारं सत्य दडलेलं असल्याचं पोलिस तपासात उघड झालं. अशातच आता या प्रकरणात पूनमच्या चुलत भावाने एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्याचं नाव सुरेंद्र असे असून त्याने एकादशी दिवशीच पूनमने मुलांची हत्या केल्याचं सांगितलं. सुरेंद्रने केलेल्या आरोपांवरून पोलीस चौकशी करत आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'या' राशीतील लोकांच्या खिशाला लागणार कात्री, काही राशीतील लोकांच्या प्रेम जीवनातील नातेसंबंधात वाढ होणार
सायको किलर पूनम ही सेनापतमधील भावड येथील रहिवासी आहे. तिचे माहेरघर हे पानिपतमधील सिवाया गावात आहे. पूनम चुलत भाऊ सुरेंद्र, जो सिवाया गावातील रहिवासी आहे, त्याने सांगितलं की पूनम त्याची चुलत भाऊ आहे, परंतु पूनमने त्याच्या मुलाचीही हत्या केली. या घटनेची माहिती देताना सुरेंद्र म्हणाले की, पूनम 18 ऑगस्ट रोजी त्याच्या घरी आली होती. एक दिवस पूनम माझ्या घरी आली आणि तिथेच राहू लागली होती.
मुलीसोबत रात्र काढली आणि दुसऱ्याच दिवशी...
आपली मुलगी जियासोबत तिनं एक रात्र काढली होती. सकाळ झाल्यानंतर जियाचा शोध घेतला पण ती कुठेच सापडली नाही. तेव्हा त्याने चिंता व्यक्त करत शोधाशोध केली. काही वेळानंतर त्याने घरातील पाण्याच्या टाकीत पाहिले असता, तिथे जियाचा मृतदेह आढळून आला होता. सुरेंद्रने सांगितलं की, जिया पूनमसोबत रात्री झोपली होती, त्यामुळे त्याला पूनमवर संशय आला होता. सुरेंद्रने जियाची हत्या केल्याचे सांगितले तेव्हा ती पूनम जाणूनबुजून रडू लागली आणि आत्महत्या करण्याचं सोंग आणू लागली होती.
भाऊ सुरेंद्रचा बहीण पूनमबाबत धक्कादायक दावा
सुरेंद्र पुढे म्हणाला की, काही कारणास्तव प्रकरण दाबण्यात आलं. पण सुरेंद्रने सांगितलं की, जिया वाचून त्याला करमत नव्हतं. त्याला एवढं माहिती होतं की, मुलीसोबत नक्कीच काहीतरी विचित्र घडलं असावं. तो या प्रकरणाचा तपास करू लागला होता. पूनमने यापूर्वी आपला मुलगा शुभम आणि नणंदेच्या मुलगी इशिकाची देखील अशाच पद्धतीने हत्या करण्यात आली होती.
त्याने विचार केला की, ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा एकादशीचा दिवस होता. तिघांची हत्या हत्या करण्याची पद्धत एकसमान पद्धतीचीच होती. सुरेंद्रने सांगितलं की,जियाच्या हत्येनंतर खूनाची मालिका काही वेळासाठी थांबली होती, कारण पूनम गर्भवती झाली होती. नाहीतर तेव्हा तिने देखील असेच अनेक कृत्य केलं असतं, असं सुरेंद्रचं म्हणणं होतं.
हे ही वाचा : नवरा बायकोला म्हणाला, 'मला थोरल्या मुलीसोबत झोपायचंय...' तिनं संतापून... नात्याला काळीमा फासणारा प्रकार
पूनमला मृत्युदंडाच्या शिक्षेची सुरेंद्रकडून मागणी
सुरेंद्रने या प्रकरणात पोलिसांकडे मागणी केली की, पोलीस प्रशासनाने पूनला कडक शासन करावं. अगदी मृत्युदंडाची शिक्षा द्यावी. ती जर पेरोलवर बाहेर आली तर सांगता येत नाही कोणाला कसं मारेल.
ADVERTISEMENT











