दीराचे वहिनीशी प्रेमसंबंध, नणंदेनं नको त्या अवस्थेत पाहिलं अन्..

मुंबई तक

• 07:04 PM • 15 Jun 2026

Crime News : दीराचे आपल्याच वहिनीशी प्रेमसंबंध होते, नणंदेनं त्या दोघांना रंगेहाथ पकडलं. त्यांच्या प्रेमसंबंधाचा भांडाफोड उघडकीस येऊ नये म्हणून त्यांनी नणंद ज्योतीची हत्या केली. हत्येनंतर मृतदेह एका चादरीत गुंडाळून नदीत फेकून दिला. 

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

चाकूने गळा चिरून निर्घृणपणे नणंदेची हत्या 

point

वहिनीला केलं अटक 

Crime News : कानपूर देहात मंगलपुर ठाणे क्षेत्रातून एक लज्जास्पद प्रकार उघडकीस आला. दीराचे आपल्याच वहिनीशी प्रेमसंबंध होते, नणंदेनं त्या दोघांना रंगेहाथ पकडलं. त्यांच्या प्रेमसंबंधाचा भांडाफोड उघडकीस येऊ नये म्हणून त्यांनी नणंद ज्योतीची हत्या केली. हत्येनंतर मृतदेह एका चादरीत गुंडाळून नदीत फेकून दिला. पोलिसांनी वहिनीला अटक केलं आणि इतर आरोपी फरार झाला. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : तरुणाकडून अभिजीत दीपकेला मारहाण, Video व्हायरल

हा धक्कादायक प्रकार मंगलपुर ठाणे क्षेत्रातील चंदकुरा गावात 5 जून रोजी उघडकीस आला. तपासातून समोर आले की, मृत नणंद ज्योतीने घरात आपल्या वहिनीला आणि छोट्या भावाला आक्षेपार्ह परिस्थितीत पाहिलं. दोघांच्या प्रेमसंबंधाचा भांडाफोड होईल, म्हणून त्यांनी नणंद ज्योतिला संपवलं.

चाकूने गळा चिरून निर्घृणपणे नणंदेची हत्या 

पोलिसांच्या माहितीनुसार, नणंद ज्योतीचा तिच्याच घरात चाकूने गळा चिरून निर्घृणपणे हत्या केली. या घटनेनंतर हे प्रकरण लपवण्यासाठी मृतदेह चादरीत गुंडाळून एका नदीत फेकून देण्यात आला. पोलिसांच्या तपासातून उघडकीस आले की, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली आणि पुरावे देखील नष्ट करण्यात आले.  

वहिनीला देखील केलं अटक 

या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आपली ओळख उघड होईल या भीतीने आरोपी हा घटनास्थळावरून पळून गेला. वहिनी ही मुंबईला जाण्याच्या तयारीत होती, मात्र पोलिसांनी तिला रेल्वे स्थानकावर अटक केली. मृतदेह वाहून नेणाऱ्या चालकाचा पोलिसांनी शोध घेतला. 

हे ही वाचा : स्पा सेंटरच्या बंद दाराआड वेश्याव्यवसायाचं रॅकेट, आरोपींवर कारवाई अन्..

मंगलपुर पोलिसांचं सांगितलं की, या खळबळजनक घटनेचा खुलासा करत आरोपी वहिनीला अटक करण्यात आली. पोलीस अन्य फरार असलेल्या आरोपींची चौकशी करत आहेत. लवकरच आरोपींना अटक केली जाईल असे सांगण्यात येते.