स्वच्छता विभागाचा प्रताप! पाणी समजून शिपायाने वरिष्ठ अधिकाऱ्याला पाजली लघवी, नेमकं काय घडलं?

crime news : एका कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला पाण्याऐवजी लघवी पाजली आहे. याप्रकरणी स्वच्छतागृहात काम करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

crime news

crime news

मुंबई तक

01 Aug 2025 (अपडेटेड: 01 Aug 2025, 06:45 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

'या' जिल्ह्यात माणुसकीला काळिमा

point

स्वच्छतागृहात काम करणाऱ्या तरुणाला बेड्या ठोकल्या

point

नेमकं काय घडलं?

Crime News : ओडिशातील गजपती जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. स्वच्छता विभागात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला पाण्याऐवजी लघवी पाजली आहे. याप्रकरणी स्वच्छतागृहात काम करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना 23 जुलै रोजी रात्री घडली होती. 

हे वाचलं का?

हेही वाचा : पुण्यातील दौंड तालुक्यात दोन गटात तुफान राडा, पोलिसांचा फौजफाटा तैनात, एकमेकांच्या घरावर दगडफेक

नेमकं काय घडलं? 

सहाय्यक कार्यकारी अभियंता गुरू प्रसाद पटनाईक आणि शिपाई सुभाष चंद्र बेहरा हे आर. उदयगिरी येथील आरडब्ल्यूएसएस कार्यालयात रात्री उशीरापर्यंत काम करत होते. तेव्हा पटनाईक यांनी बेहरा यांच्याकडे पाण्याच्या पाण्याची मागणी केली. बेहरा यांनी दिलेल्या बाटलीत पाण्याऐवजी लघवी दिल्याचा आरोप करण्यात आला. काम करण्याच्या ठिकाणी काही अंशी प्रमाणात अंधार होता, तसेच कामाचा ताण तणाव असल्याने पटनाईक यांनी काहीही न बघता पाणी पाणी समजून लघवी प्यायली. अचानकपणे त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली.

दरम्यान, बाटलीतून लघवीचा वास आल्याने संशय बळावला गेला. त्यानंतर तपास करण्यात आला असता, बाटलीमध्ये पाण्याऐवजी मूत्र होते. यानंतर तपासातून असे दिसून आले की, बाटलीत पाणी नसून लघवी होती. पटनायक यांची तब्येत आणखी बिघडली गेली, त्यानंतर त्यांना ताबडतोब बेरहमपूर येथील एमकेसीजी मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

हेही वाचा : क्ताळलेला चेहरा अन् कपडे फाटलेली, प्रेयसीची अवस्था पाहून बॉयफ्रेंड...नेमकं काय घडलं?

उपचारानंतर आता पटनायक यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांनी आर उदयगिरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी कारवाई करत आरोपी शिपाई सुभाषचंद्र बेहरा यांना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर चौकशी करत त्यांना अटक केली.

संबंधित प्रकरणावरील प्रश्नोत्तरे

1 प्रश्न : वरिष्ठ अधिकाऱ्याला पाण्याऐवजी कोणी लघवी पाजली ? 

उत्तर : शिपाई सुभाष चंद्र बेहरा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना लघवी पाजली

2 प्रश्न : ही घटना कुठे घडली? 

उत्तर : ओडिशातील गजपती जिल्ह्यात घडली होती.  

    follow whatsapp