Crime news : आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. या ठिकाणी मुलाने आपल्याच आई आणि धाकट्या भावाची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. तरुणाने नेमकं असं का केलं असावं? याबाबतची माहिती आता समोर आली आहे. संबंधित प्रकरणातील आरोपीचे नाव श्रीनिवास (वय 38) असे आहे. तर धाकट्या भावाचे नाव रवी तेजा (वय 33) आणि आईचं नाव महालक्ष्मी (वय 60) असे आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : दिल्लीत झालेल्या स्फोटात भाजप नेत्याचा मुलगा जखमी, कुटुंबीयांनी सांगितली स्फोटाची कहाणी
आई नेहमीच त्याच्या धाकट्या मुलाची बाजू घ्यायची म्हणून...
हा वाद इतका तीव्र होता की, श्रीनिवासला बऱ्याच काळापासून असे वाटत होते की, त्याची आई नेहमीच त्याच्या धाकट्या मुलाची बाजू घ्यायची. श्रीनिवासला बऱ्याच काळापासून असे वाटत होते की, त्याची नेहमीच धाकट्या मुलाची बाजू घेते. कुटुंबातील वादात तो नेहमी एकटाच पडायचा. यामुळे तो सतत रागाने लालबुंद व्हायचा.
आई आणि भावावर चाकूने हल्ला
रागाच्या भरात त्याने स्वयंपाकघरातून चाकू काढला. काही क्षणातच त्याने त्याच्या आई आणि भावावर चाकूने हल्ला केला. शेजारचे लोक येईपर्यंत मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले. दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत धक्कादायक बाब म्हणजे हत्येनंतर तात्काळ श्रीनिवासने स्वत: पोलिसांना फोन केला आणि म्हणाला की, मी माझ्या आई आणि भावाची हत्या केली आहे, मला अटक करा.
हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगर हादरलं! भररस्त्यातच 'त्या' एका कारणावरून आरोपीने तरुणाचा गळा चिरला, नंतर...
प्राथमिक माहितीनुसार, चौकशीत आरोपीने आपला गुन्ह्याचा कबुलीनामा दिला आहे. मानसिकष्ट्या खचलेल्याचे सांगितले जात आहे. दुहेरी हत्याकांडच्या घटनेनं परिसर हादरून गेलं आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 103 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणाचा तपास सुरु आहे.
ADVERTISEMENT











